Bambolim Nauxim Beach Solar Lights
पणजी: नावशी-बांबोळी समुद्रकिनाऱ्यावरील मच्छीमारांच्या दैनंदिन जीवनात सौर ऊर्जेचा प्रकाश पसरला आहे. सांतआंद्रे मतदारसंघात ग्रीन एनर्जीचे प्रमाण वाढवण्याच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.
या भागात असलेल्या मच्छीमारांना अंधारात मासेमारी करण्याची समस्या होती. यामुळे अपघातांचे प्रमाण वाढत होते. तसेच उत्पादकता कमी होत होती. त्यामुळे आमदार विरेश बोरकर यांनी मत्सव्यावसाय खात्याच्या सहकार्याने राज्य एनर्जी विकास एजन्सीच्या मदतीने नावशी येथे हे सोलर पॅनल सिस्टम प्रकल्प मंजूर करून घेतला.
या प्रकल्पाअंतर्गत समुद्रकिनाऱ्यावर २० ते ४० वॉल्टचे सुमारे ८ सोलर पॅनल आधारित वीज खांब उभारण्यात आले आहेत. या खांबांमुळे मच्छीमारांना रात्रीच्या वेळी सुरक्षितपणे मासेमारी करण्यास मदत होईल. याशिवाय, किनारा अधिक प्रकाशमान होईल आणि पर्यटकांसाठीही आकर्षक ठिकाण बनेल.
भविष्यात बांबोळी आणि शिरदोण समुद्रकिनाऱ्यावरही अशाच प्रकारचे प्रकल्प राबवण्याचा आमदार बोरकर यांचा विचार आहे. यासाठी तेथील मच्छीमारांची साथ देण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.