Goa Drug Case Dainik Gomantak
गोवा

Goa Drugs Case: मालभाट गांजा प्रकरणात नवा खुलासा! मोठी रॅकेट असण्याची शक्यता; फ्लॅट मालकाची होणार चौकशी

Malbhat Drugs Case: मडगाव पोलिसांनी मालभाट येथे पकडलेल्या गांजा प्रकरणाची व्याप्ती बरीच मोठी असून, त्या ठिकाणी असलेल्या एका फ्लॅटमध्ये हा गैरप्रकार चालू होता अशी माहिती मडगाव पाेलिसांनी दिली आहे.

Sameer Panditrao

मडगाव: शनिवारी रात्री मडगाव पोलिसांनी मालभाट येथे पकडलेल्या  गांजा प्रकरणाची व्याप्ती बरीच मोठी असून, त्या ठिकाणी असलेल्या एका फ्लॅटमध्ये हा गैरप्रकार चालू होता अशी माहिती मडगाव पाेलिसांनी दिली आहे. मात्र या धाडीत ज्‍या संशयिताला गांजासह अटक केली त्‍याच्‍याकडेच सापडलेला माल वजनाने किरकोळ स्‍वरुपाचा असल्‍याने न्‍यायालयाकडून त्‍याला जामीन मंजूर झाला.

शनिवारी रात्री मडगाव पोलिसांनी मालभाट येथील एका फ्‍लॅटवर सापळा रचून छापा टाकला हाेता. त्‍यात कुडतरी येथील मेलरॉय  रिकार्डो याला रंगेहाथ  पकडून  त्याच्याकडील  ५० हजार रुपये किंमतीचा गांजा जप्त केला होता.

मात्र, ज्‍या फ्‍लॅटमध्‍ये हा संशयित सापडला तो फ्‍लॅट अन्य एकाच्या नावावर असून संशयित त्‍या फ्‍लॅटमध्‍ये का गेला होता याचा तपास पोलिस करत आहेत. त्‍यामुळे सध्या अनेकजण पोलिसांच्या रडारवर आहेत.  ज्या फ्लॅटमध्ये हा गैरव्यवहार चालू होता, तो फ्‍लॅटमालक आणि पकडलेला संशयित हे दोघेही कुडतरी येथील एकाच गावातील आहेत.

पोलिसांनी  जेव्हा रात्री छापा टाकला त्यावेळी मेलरॉय  हा गांजाच्या नशेत होता. त्याच्याकडे  ५०० ग्रॅम गांजा पोलिसांना सापडला होता. तो जप्त करून नंतर त्याला पोलिसांनी अटक केली होती. 

तिथे अनेक दिवसांपासून ड्रग्स व्यवहार?

संशयितांकडे सापडलेल्या अंमली पदार्थांचे प्रमाण जामीन पात्र आहे. तरीही या फ्लॅटमध्ये अनेक दिवसांपासून ड्रग्सचा  व्यवहार चालत होता, असा संशय पोलिसांना आहे.  ज्याच्या नावावर हा फ्लॅट आहे, त्याचे हल्लीच ऑपरेशन झाले आहे. सध्या तो आपल्या मूळ घरी आहे. त्याची तब्येत पूर्ण ठीक  झाल्यानंतर त्याची पोलिस चौकशी करणार असल्याची माहिती पोलिस सूत्रांची दिली. पोलिस निरीक्षक सूरज सामंत यांच्या माग्दार्शनाखाली पोलिस पुढील तपास करीत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT