Goa Drugs Cases: गोव्यात सापडले 73 कोटींचे ड्रग्‍ज! 78 प्रकरणे नोंद; 15 विदेशी नागरिकांना अटक

Goa drug seizure cases: यावर्षी गेल्या साडेपाच महिन्यांत राज्यभरात ७८ ड्रग्जची प्रकरणे नोंद झाली आहेत. त्यामध्ये ९८ जणांना अटक करून ७३.७५ कोटींचा अंमलीपदार्थ जप्त करण्‍यात आला.
Goa Drugs Case
Goa Drug CaseDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: यावर्षी गेल्या साडेपाच महिन्यांत राज्यभरात ७८ ड्रग्जची प्रकरणे नोंद झाली आहेत. त्यामध्ये ९८ जणांना अटक करून ७३.७५ कोटींचा अंमलीपदार्थ जप्त करण्‍यात आला. गेल्या वर्षभरात ९.९१ कोटींचे ड्रग्ज जप्त करण्‍यात आले होते. त्यामुळे यंदा हे प्रमाण सुमारे सातपटीने वाढले आहे.

गोवा पोलिसांकडून ड्रग्जमाफिया तसेच विक्रेत्यांवर असलेल्या देखरेखीमुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात गुन्हे दाखल झाले आहेत. येत्या रविवारी २२ रोजी गोव्यात आंतरराष्ट्रीय अंमलीपदार्थविरोधी दिवस पाळण्यात येणार आहे. त्यानिमित्त ड्रग्जविरोधी जनजागृती करण्यात येणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांच्या तत्परतेमुळे दरवर्षी दीडशेहून अधिक ड्रग्जची प्रकरणे नोंद केली जातात.

यावर्षी जिल्हा, क्राईम ब्रँच, अंमलीपदार्थविरोधी कक्ष तसेच कोकण रेल्वे पोलिसांनी मिळून केलेल्या कारवाईत ७८ प्रकरणे नोंद झाली आहेत. यामध्ये अटक झालेल्या ९८ पैकी २६ गोमंतकीय, ५७ देशी व १५ विदेशी नागरिकांचा समावेश आहे. यामध्ये ५ महिला आहेत.

सुमारे १५० किलो ड्रग्ज जप्त करण्‍यात आले, त्यात अधिक तर ८० टक्के गांजा आहे. सर्वाधिक ड्रग्ज प्रकरणे अंमलीपदार्थविरोधी कक्ष व दक्षिण गोव्यात प्रत्येकी १६ नोंद झाली आहेत.

Goa Drugs Case
Mapusa Drugs Seized: गोवा पोलिसांची कारवाई! धुळेर-म्हापशात 30 किलो गांजासह दोघांना अटक

क्राईम ब्रँचने ११ तर उत्तर गोव्यात १४ प्रकरणांची नोंद झाली आहे. आतापर्यंत अटक केलेले विदेशी नागरिक नऊ देशांमधील आहेत.

गेल्या वर्षी २०२४ मध्ये १६२ ड्रग्ज प्रकरणे नोंद झाली होती. १९० जणांना अटक होऊन ९.९१ कोटींचे ड्रग्ज जप्त करण्यात आले होते. अटक केलेल्यांमध्ये गोमंतकीय ५६, देशी ११० व विदेशी २४ जणांचा समावेश होता. त्‍यात फक्त २ महिला होत्‍या.

Goa Drugs Case
Goa Drugs: गोवा ड्रग्जचे संक्रमण केंद्र! दक्षिणेतील 8 राज्यांच्या बैठकीत सूर; तस्करीवर नियंत्रण ठेवण्यासाठी समन्वय

अटक केलेले विदेशी ९ देशामधील होते. त्यात नायजेरियन ९ जण होते. उत्तर गोव्यात त्यावेळी सर्वाधिक ६७ प्रकरणे नोंद झाली होती. त्यापाठोपाठ दक्षिण गोवा ३९, क्राईम ब्रँच २३ व कोकण रेल्वेने ३ प्रकरणे नोंदवली होती. सुमारे २७५ किलो ड्रग्ज जप्त केले होते.

राज्यात अधिक तर नायजेरियन नागरिक ड्रग्ज व्यवसायात आहेत. त्यामुळे पोलिसांनी काही महिन्यांपूर्वी भाडेकरूंची पडताळणी मोहीम (कोम्बिंग ऑपरेशन) सुरू केले होते. त्यावेळी ड्रग्ज व्यवसायातील काही विदेशी नागरिक गोव्यातून गायब झाले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com