Indian Languages  Dainik Gomantak
गोवा

Goa News: 'राजभाषेच्या प्रसारासाठी आर्थिक तरतूद करा'

राजभाषेच्या प्रसारासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद करणे आवश्यक - माजी शिक्षणमंत्री ॲड. डॉम्निक फर्नांडिस

दैनिक गोमन्तक

Goa News: राजभाषेच्या प्रसार आणि उत्कर्षासाठी प्रदेशाच्या अर्थसंकल्पात भरीव तरतूद करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन माजी कायदे तथा शिक्षणमंत्री ॲड. डॉम्निक फर्नांडिस यांनी केले. सावर्डे - कुडचडे येथील शणै गोंयबाब सेवा केंद्र आयोजित स्व. राजेंद्र (राजू) चिमणू नाईक स्मृती अखिल गोवा कोकणी कविता स्पर्धा, मरणोत्तर सन्मान आणि बक्षीस वितरण समारंभात ते प्रमुख पाहुणे या नात्याने बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर डॉ. सर्वानंद सावंत देसाई व प्रा. मनिषा उपाध्ये प्रभूदेसाई सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते. येथील आय. एन. सी. सभागृहात हा कार्यक्रम झाला.

राजभाषेच्या आधारावरच गोवा प्रदेशाला घटक राज्य दर्जा मिळाल्याने राजभाषेचे महत्त्व समजून घेणे आवश्यक आहे. शासनाने याकामी अहंम भूमिका निभावली पाहिजे, असेही ते पुढे म्हणाले.

कविता सादरीकरण स्पर्धेत अंबेश तलवडकर यांच्या ‘मनीस सामको बीझी जाला’ या कवितेस तीन हजार रुपयांचे प्रथम बक्षीस मिळाले, तर देविता ईश्वर खुळे व सागर वेळीप यांना अनुक्रमे दुसरे अडीच हजार रुपये व तिसरे दोन हजार रुपयांची बक्षिसे प्राप्त झाली.

याव्यतिरिक्त साईशा शेट शिरोडकर, रिया कुडाळकर व साईशा सराप यांना उत्तेजनार्थ बक्षिसे मिळाली.

कार्यक्रमात कथिका लेखन स्पर्धेचे विजेते देविता खुळे, शितल परब, तुलसी पर्येकर, तन्मयी सहकारी, वर्धा खांडेपारकर आणि अनिकेत वांयगणकर यांनाही बक्षिसे वितरीत करण्यात आली. रमिता नाईक यांनाही स्व. राजेंद्र नाईक यांच्या एकनिष्ठ कार्यशिलतेबद्दल गौरविण्यात आले.

डॉ. सर्वानंद, सौ. मनिषा आणि परिक्षकातर्फे राग सबनीस यांचेही समयोचीत मार्गदर्शन झाले. मनोहर नाईक यांनी प्रास्ताविक केले, तर स्नेहल रामा नाईक हिने करून आभार मानले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: राज्यात क्रीडापटूंसाठी 4 टक्के पदे राखीव

Arjun Tendulkar: अर्जुन तेंडुलकरने महाराष्ट्राला गुंडाळले! 36 धावांत पटकावले 5 बळी; गोव्याकडे 22 धावांची आघाडी

Kadamba Bus: ‘कदंब’च्‍या ताफ्‍यात 200 बसेसचा तुटवडा! 80 गाड्या लवकरच होणार दाखल; ‘म्हजी बस’ची संख्‍या वाढणार

Goa Politics: खरी कुजबुज; कामत अन् तवडकर

Shirguppi Ugar: गर्भवती पत्नीला कारने उडवले, अपघात भासवून केला खून; संशयित पतीला अटक

SCROLL FOR NEXT