Zuari Bridge
Zuari BridgeDainik Gomantak

Zuari-Bridge: नव्या झुआरी पुलावरून सेल्फी घेण्याचा मोह पर्यटकांना आवरेना

युरींची उपहासात्मक टीका- पर्यटकांच्या वाहनांच्या लागतात रांगा
Published on

Zuari-Bridge: झुआरी पुलावर सध्या पर्यटकांची वाहने सर्रासपणे थांबलेली दिसतात. पर्यटकांना पुलावरून छायाचित्रे काढण्याचा मोह आवरत नसल्याने हौसी पर्यटकांच्या वाहनांच्या रांगाच्या रांगा लागलेल्या दिसतात.

विशेष बाब म्हणजे या रांगा पाहून विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी व्हिडिओ क्लिपद्वारे ट्विट करीत राज्य सरकारच्या मंत्र्यांवर उपाहासात्मक टीका केली आहे. ते ट्विट सध्या समाज माध्यमांत चर्चेत आहे.

मागील वर्षी डिसेंबरमध्ये 26 तारखेला झुआरी पुलाचे लोकार्पण होणार होते, परंतु उद्‍घाटनास येणारे केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांचा दौरा लांबल्याने तो कार्यक्रम 29 रोजी निश्‍चित झाला. त्यामुळे सरकारने लोकांसाठी झुआरी पूल उद्‍घाटनापूर्वी दोन दिवस खुला ठेवला.

या काळात गोमंतकीयांसह राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी पुलावर हजेरी लावली. होणारी गर्दी लक्षात घेऊन या पुलावर शितपेय व खाद्यपदार्थ विक्री करणारे गाडे लागल्याने सरकारवर टीकाही झाली. सेल्फी काढणाऱ्यांची संख्या झुआरी पुलावर लक्षणीय होती.

विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी राज्य सरकारातील मुख्यमंत्री, वाहतूकमंत्री आणि पर्यटनमंत्र्यांना टॅग करीत त्यांच्यावर उपहासात्मक टीका करणारे केलेले ट्विट सध्या समाज माध्यमांत चर्चेत आहे.

 Zuari Bridge
Mahadayi Water Dispute : गोव्याची जीवनदायिनी 'म्हादई' संपली तर झुवारीही संपेल!

युरींकडून मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन

युरी आलेमाव यांनी ट्विट करून मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन केले आहे. त्यात म्हटले आहे, की नवा झुआरी पूल सर्व पर्यटकांसाठी मोफत स्थळ निर्माण केले असल्याबद्दल अभिनंदन. परिवहन मंत्री तिसरा विमानतळ शोधण्यात व्यस्त आहेत आणि पर्यटनमंत्री डान्स बारमध्ये व्यस्त आहेत.

त्यामुळे सर्व गोमंतकीयांनी ‘भिवपाची गरज आसा’, असे हे ट्विट असून हजारावर लोकांनी ट्विटरवरील व्हिडिओ क्लिप पाहिली आहे.

 Zuari Bridge
Goa Environment:...यामुळे सांगेत धोकादायक झाडांची कापणी सुरू

पूल बनले पर्यटन स्थळ!

वाहतुकीसाठी पूल खुला होऊन 20 दिवस होत आले आहेत. पुलावरून वाहतूक सुरू झाल्याने जुन्या पुलावरील वाहतुकीचा ताण कमी झाला आहे. परंतु नवा पूल हे आता पर्यटनस्थळ बनले की काय? असे वाटू लागले आहे. कारण चारचाकी वाहने घेऊन येणारे पर्यटक पुलावर वाहन थांबवून छायाचित्रे काढताना दिसत आहेत. हा प्रकार सध्या नित्याचाच झाला आहे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com