Goa Rain Update Dainik gomantak
गोवा

राज्याला अवकाळी पावसाने झोडपले; किनारी भागाला वादळी वाऱ्याचा मोठा फटका

नागरिकांनी खबरदारी घ्यावी असे आवाहन IMDने केले होते

दैनिक गोमन्तक

गोवा: गोव्याच्या अनेक काल रात्री अनेक भागांत ढगांच्या गडगडाटासह आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडला. दरम्यान याबाबत IMD ने अंदाज वर्तवला होता. तसेच "उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा जिल्ह्यांतील अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली होती. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घ्यावी असे आवाहन IMDने केले होता.

(Major damage due to unseasonal rains in coastal areas in the Goa state)

ताज्या रडार प्रतिमांमधून दिसल्याप्रमाणे, गडगडाटी ढग प्रणाली गोव्याजवळ येत आहे, तसेच पुढील काही तासात गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि 40-50 किमी प्रतितास वेगाने वाहणारे वारे.

पाळोळे व अन्य किनाऱ्याला वादळी वाऱ्याचा फटका

पाळोळे व अन्य किनाऱ्याला वादळी वाऱ्याचा सोमवारी रात्री फटका बसला. सोसाट्याचे वारे जमिनीवरून समुद्राकडे वाहत असल्याने किनाऱ्या लगत असलेल्या पर्यटक कुटिरांतील व‌ रेेस्टॉरंटातील प्लास्टिक खुर्च्या वाऱ्याच्या जोरदार झोताबरोबर समुद्रात जाऊन पडल्या.ओव्हरे पाळोळे येथे एका घरावर माड पडून घराची नुकसानी झाली तर पाळोळे मध्ये चार- पांच माडांची पडझड वीज तारांवर झाली त्यामुळे या भागातील

वीज प्रवाह रात्रीपासून खंडीत झाला आहे.या वादळी वाऱ्यामुळे मडगाव- कारवार हमरस्त्यावर करमलघाटात वृक्ष उन्मळून पडल्याने वाहतूकीला अडथळा निर्माण झाला.काल रात्री पासूनच अग्नीशामन केंद्राचे कर्मचारी पडझड झालेले वृक्ष व माड हटविण्याच्या कामात व्यस्त आहेत.(Goa Weather Update)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Women’s Asia Cup 2026: मैदानावर पुन्हा रंगणार भारत-पाक थरार! टीम इंडियाच्या वाघिणी सज्ज; मॅचची तारीख, वेळ आणि थेट प्रक्षेपणाचे सर्व अपडेट्स एका क्लिकवर

VIDEO: 'नेपाळमध्ये जलतांडव होईल, घरं पाण्यात बुडतील...' दोन महिन्यांपूर्वीचा व्हिडीओ व्हायरल; पाद्रीनं आधीच दिली होती संकटाची चाहूल

Unicef Child Safety Report: 1 वर्षात 2 कोटी मुले ठरली ऑनलाईन लैंगिक शोषणाची शिकार, युनिसेफच्या रिपोर्टनं खळबळ; धक्कादायक वास्तव आलं समोर

Goa Crime: लग्नाचे वचन, शारीरिक संबंध अन् 18 लाखांच्या फसवणूकीचा आरोप; ठोस पुराव्याअभावी संशयिताची निर्दोष सुटका

Electric Shock Death: विहिरीतील पंप तपासण्यासाठी गेला अन्... विजेचा धक्का बसून तरूणाचा दुर्दैवी मृत्यू, सातोर्ली-गावडोंगरी येथील घटना

SCROLL FOR NEXT