पाळोळेसह काणकोणच्या किनारपट्टीला पावसाचा तडाखा

वादळी वाऱ्यामुळे वीज तारांवर उन्मळून पडला माड.
पाळोळे किनारा परिसरात वादळी वाऱ्यामुळे वीज तारांवर उन्मळून पडलेला माड
पाळोळे किनारा परिसरात वादळी वाऱ्यामुळे वीज तारांवर उन्मळून पडलेला माडDainik Gomantak
Published on
Updated on

काणकोण: पाळोळे व अन्य किनाऱ्याला वादळी वाऱ्याचा सोमवारी रात्री फटका बसला. सोसाट्याचे वारे जमिनीवरून समुद्राकडे वाहत असल्याने किनाऱ्या लगत असलेल्या पर्यटक कुटिरांतील व‌ रेेस्टॉरंटातील प्लास्टिक खुर्च्या वाऱ्याच्या जोरदार झोताबरोबर समुद्रात जाऊन पडल्या.ओव्हरे पाळोळे येथे एका घरावर माड पडून घराची नुकसानी झाली तर पाळोळे मध्ये चार- पांच माडांची पडझड वीज तारांवर झाली त्यामुळे या भागातील

वीज प्रवाह रात्रीपासून खंडीत झाला आहे.या वादळी वाऱ्यामुळे मडगाव- कारवार हमरस्त्यावर करमलघाटात वृक्ष उन्मळून पडल्याने वाहतूकीला अडथळा निर्माण झाला.काल रात्री पासूनच अग्नीशामक केंद्राचे कर्मचारी पडझड झालेले वृक्ष व माड हटविण्याच्या कामात व्यस्त आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com