Goa Crime News Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: लग्नाचे आमिष दाखवले, 3 वर्षे तरुणीवर लैंगिक अत्याचार; 28 वर्षांच्या तरुणाला अटक

Maina Curtorim Crime: मायणा-कुडतरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका २८ वर्षीय युवतीवर विवाहाचे आमिष दाखवून दीर्घकाळ बलात्कार झाल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे.

Sameer Panditrao

मायणा-कुडतरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका २८ वर्षीय युवतीवर विवाहाचे आमिष दाखवून दीर्घकाळ बलात्कार झाल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी तन्मय काळणेकर (२८, रा. थिवी) या तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारीनुसार, संशयित तन्मय काळणेकर याने पीडितेला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर तिला खोटे विवाहाचे आश्वासन देत जानेवारी २०२२ पासून जुलै २०२५ पर्यंत सतत लैंगिक शोषण केले. दीर्घ काळ चाललेल्या या अत्याचारामुळे पीडिता मानसिक व शारीरिकदृष्ट्या त्रस्त झाली. अखेर पीडितेने धैर्य दाखवत मायणा-कुडतरी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली.

या गंभीर प्रकरणाची नोंद घेत पोलिसांनी प्राथमिक तपास सुरू केला असून, पुढील तपासासाठी हा गुन्हा आगशी पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या बलात्काराशी संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलिस आरोपीला अटक करण्यासाठी प्रयत्नशील असून, पुढील तपास पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Naru In Goa: गोमंतकीयांसाठी धोक्याची घंटा! गोव्यात आढळला खतरनाक 'नारू'; खांडेपार, कुर्टी येथे सापडला जंतू

Tragic Death: काळीज पिळवटले! खेळता खेळता पडला विहिरीत, मृत्यूशी दिली झुंज; 3 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी अंत

Zenito Cardozo Case: शिरदोन गँगवॉर प्रकरण! जेनिटोला ‘सुप्रीम’ दिलासा; 3 वर्षांच्या शिक्षेला पुढील सुनावणीपर्यंत स्थगिती

Goa Crime: मालमतेच्या वादातून जबरी मारहाण, मृतदेह सापडला गंभीर अवस्थेत; 3 कामगारांना अटक, मुख्‍य सूत्रधार बेपत्ता

Saligao Murder: एकाच खोलीत दोघांचे मृतदेह! दुहेरी खुनाच्या घटनेने साळगाव हादरले; संशयित मुंबईकडे फरार झाल्याची शक्यता

SCROLL FOR NEXT