Villagers protest against the proposed Maina Curtorim mega housing project in Goa Dainik Gomantak
गोवा

Maina Curtorim Mega Project Protest: सरपंच, सचिवावर कारवाई करा! मायणा-कुडतरी मेगा गृहप्रकल्पाला ग्रामस्थांचा तीव्र विरोध

curtorim panchayat additional director hearing: मायणा-कुडतरी येथील प्रस्तावित मेगा गृह प्रकल्पाविरोधात स्थानिकांचा विरोध दिवसेंदिवस तीव्र होतोय.

दैनिक गोमन्तक डिजिटल

सासष्टी: मायणा-कुडतरी येथील प्रस्तावित मेगा गृह प्रकल्पाविरोधात स्थानिकांचा विरोध दिवसेंदिवस तीव्र होत असून, याप्रकरणी पंचायत खात्याच्या अतिरिक्त संचालकांकडे सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान गुरुवारी संबंधित अधिकारी गैरहजर राहिल्याने सुनावणी पुन्हा तहकूब करण्यात आली. या प्रकरणात आतापर्यंत पाच सुनावण्या झाल्या असून, संबंधित अधिकारी वारंवार अनुपस्थित राहत असल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.

या प्रकरणात गट विकास अधिकाऱ्यांनी कुडतरी ग्रामपंचायतीवर कर्तव्यात हलगर्जीपणाचा शेरा मारला आहे. त्यानंतर स्थानिकांनी मावळते सरपंच व ग्रामसचिव यांच्या विरोधात तक्रार दाखल करून त्यांच्यावर खात्याअंतर्गत तसेच प्रशासकीय चौकशी करून योग्य कारवाईची मागणी केली.

सुनावणीनंतर पत्रकारांशी बोलताना काँग्रेस (Congress) नेते मोरेन रेबेलो आणि मिशेल रेबेलो यांनी सांगितले की, संबंधित अधिकारी यापूर्वीही तीनवेळा सुनावणीस गैरहजर राहिल्याने या संपूर्ण प्रकरणात काहीतरी संशयास्पद असल्याची शक्यता वाटते. अधिकारी अनुपस्थित असल्यामुळे नियोजित अंतरिम अर्जही दाखल करता आला नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd ODI: तिसऱ्या वनडेत मोठा बदल! रोहित शर्मा बाहेर, यशस्वी जयस्वालची एन्ट्री; पाहा टीम इंडियाची संभाव्य Playing-11

Goa FDA: तीन महिन्यांत 20.43 लाखांचा दंड; 'एफडीए'ची धडक कारवाई, 2,528 अन्न आस्थापनांची तपासणी

Goa Forward Panel: दामोदर कॉलेज विद्यार्थी मंडळ निवडणुकीत 'गोवा फॉरवर्ड'चा झेंडा; चारही प्रमुख जागा पॅनलच्या ताब्यात

VIDEO: देवीची मूर्ती आणताना काळाचा घाला! दुर्गोत्सवाच्या तयारीला गालबोट, भीषण अपघातात 7 जणांचा मृत्यू; 21 जखमी

Diveagar Beach Tragedy: दिवेआगर समुद्रात बुडून 8 विद्यार्थ्यांचा मृत्यू; सहलीसाठी आलेल्या आळंदीतील विद्यार्थ्यांवर काळाचा घाला

SCROLL FOR NEXT