

मडगाव: या प्रकल्पांमुळे गावाचे गावपण नष्ट होणार असून स्थानिकांच्या हातातून गाव निसटणार असल्याची भीती व्यक्त करून प्रकल्पांना विरोध दर्शवित दवंडे-फातोर्डातील नागरिकांनी गुरुवारी (ता.९) प्रकल्पाच्या स्थळापासून मडगाव पालिकेपर्यंत मोर्चा काढला व प्रकल्पाला विरोध असल्याच्या घोषणा दिल्या.
आम्ही दोन महिन्यांपूर्वी या गावात २९४ फ्लॅटच्या येणाऱ्या प्रकल्पाला विरोध केला होता. आता आणखी प्रकल्प येत असून त्याला स्थानिकांचा विरोध आहे. हे प्रकल्प रद्द करण्यात यावे, अशी मागणी आंदोलकांनी केली. पालिकेबाहेर जमाव करून घोषणाबाजी केली. यावेळी मडगाव पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता. प्रवेशद्वार बंद केल्याने मोर्चात सहभागींनी निषेध व्यक्त केला. मागाहून पोलिसांनी (Police) गेट उघडल्यावर त्या सर्वांनी पालिका मुख्याधिकारी मधु नार्वेकर यांची भेट घेऊन त्यांना आपले निवेदन दिले. नार्वेकर यांनी याबाबत पंधरा दिवसांत निर्णय घेण्याचे आश्वासन नागरिकांना दिले.
नार्वेकर यांनी सांगितले की, दवंडे येथील प्रकल्पस्थळी लावलेले होर्डिंग्ज काढण्याच्या सूचना यापूर्वीच पालिकेने दिल्या होत्या. नागरिकांनी पालिकेच्या पत्रव्यवहाराचे उत्तर सादर केले असून, पालिकेकडून कोणत्याही प्रकल्पाला परवानगी दिलेली नसल्याचे स्पष्ट केले आहे. यापूर्वी ‘एसजीपीडीए’ने दिलेल्या परवानगीच्या आधारे उभारणी झाली असून, नागरिकांचे निवेदन ‘एसजीपीडीए’कडे पाठविण्यात येणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.