Assagao House Demolition Dainik Gomantak
गोवा

Pooja Sharma: अटक टाळण्यासाठी पूजाची धडपड; जामिनासाठी आता उच्च न्यायालयात धाव

Pramod Yadav

आसगाव घर मोडतोड प्रकरणातील मुख्य संशयित पूजा शर्माची अटक टाळण्यासाठी धडपड सुरु आहे. प्रधान सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर पूजाने गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला आहे.

आसगाव येथील आगरवाडेकर कुटुंबीयांचे घर मोडतोड प्रकरणी पूजा शर्मावर अटकेची टांगती तलवार आहे. शर्माच्या अटकपूर्व जामिनीसाठी केलेल्या अर्जावर गुरुवारी प्रधान सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी न्यायालयाने पूजा शर्माचा अर्ज फेटाळला.

त्यामुळे तिच्या अटकेचा मार्ग मोकळा झाला होता. दरम्यान, अटक टाळण्यासाठी पूजा सर्वोतोपरी प्रयत्न करतान दिसत असून, आता तिने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात जामिनासाठी अर्ज केला आहे. आज (दि.१२ जुलै) दुपारी अडीच वाजता याप्रकरणी सुनावणी होणार आहे.

आसगाव येथील घर मोडतोड प्रकरणात जेसीबी चालक, इस्टेट एजंट, महिला बाऊन्सर्स, कार मालक यांना अटक करण्यात आली त्यानंतर त्यांची जामिनावर देखील सुटका करण्यात आली. दरम्यान, या प्रकरणातील मुख्य संशयित पूजा शर्माला अटकेची मागणी जोर धरु लागली होती.

गुन्हे शाखेच्या एसआयटीने पूजा शर्माला समन्स देखील बाजवाला मात्र, तिने चौकशी टाळण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पूजाने जामिनासाठी प्रधान सत्र न्यायालयात अर्ज केला. तेथे जामीन फेटाळल्यानंतर पूजाने उच्च न्यायालयात अर्ज केला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: कुळण-सर्वण येथे विजेच्या धक्क्याने युवकाचा मृत्यू

Goa Taxi: ..हे तर सरकारचे कारस्थान! जीएसटी नोटीसींवरुन टॅक्सीमालक नाराज

Goa University: विद्यापीठाच्या कुलगुरूंना घेराव! गोवा फॉरवर्डचा हल्लाबोल; शिष्‍टमंडळाशी चर्चा होणार

Rashi Bhavishya 18 October 2024: उत्तम द्रव्यलाभ होईल, व्यावसायिकांसाठी आजचा दिवस आशादायी

Goa Marine Projects: ..गोव्यात अखेर '23 प्रकल्‍पांची' मान्यता रद्द! रोजगार तसेच कोटींच्‍या गुंतवणुकीवर पाणी

SCROLL FOR NEXT