वारीत चालून पाय थकले, कारमध्ये बसली अन् मृत्यूने गाठले; गोव्याची वारकरी महिला अपघातात ठार

Pandharpur Accident Case: पायी चालून थकवा आल्याने महिला कारमध्ये बसली. दरम्यान कारचा पुढे जाऊन अपघात झाला.
वारीत चालून पाय थकले, कारमध्ये बसली अन् मृत्यूने गाठले; गोव्याच्या वारकरी महिलेचा अपघाती मृत्यू
Pandharpur Accident Dainik Gomantak
Published on
Updated on

गोव्यातून पंढरपूरला निघालेल्या वारकरी महिलेचा अपघातात मृत्यू झाला आहे. पायी वारीत चालून अस्वस्थ वाटू लागल्याने कारमध्ये बसलेल्या कारचा सोलापूर महामार्गावर अपघात झाला, त्यात महिलेला मरण आले तर अन्य दोघे जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गौरी कुडतरकर (कोलवाळ) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.

महिला अस्नोडा ते पंढरपूर वारीत सहभागी झाली होती. पायी चालून थकवा आल्याने महिला कारमध्ये बसली. दरम्यान कारचा पुढे जाऊन अपघात झाला.

महिला बसलेल्या कारला पाठीमागून येणाऱ्या इनोव्हा कारने जोराची धडक दिली. यात गौरी यांचा मृत्यू झाला असून, दोनजण जखमी झाले आहेत. अपघातात दोन्ही कारचा चक्कचूर झाला असून, कारचे मोठे नुकसान झाले आहे.

वारीत चालून पाय थकले, कारमध्ये बसली अन् मृत्यूने गाठले; गोव्याच्या वारकरी महिलेचा अपघाती मृत्यू
Sunburn Goa 2024: तोच जल्लोष, स्थळ नवे! सनबर्न आता दक्षिण गोव्यात

गोव्यातून दरवर्षी मोठ्या प्रमाणावर वारकरी पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी जात असतात. यावर्षी देखील अनेक वारकरी पंढरपूरला गेले आहेत. राज्यातील विविध भागातून पायी वारी करणारे वारकरी हिरहिरीने वारीत सहभागी होत असतात.

दरम्यान, अस्नोडा ते पंढरपूर वारीत सहभागी झालेल्या गौरी कुडतरकर यांचा अपघाती मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com