Goa CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

'गांधींच्या तत्त्वज्ञानावर चालणे हीच खरी श्रद्धांजली'! CM सावंतांचे प्रतिपादन; ‘गावांच्या विकासाचे’ स्वप्न सत्यात आणण्यासाठी करणार प्रयत्न

CM Pramod Sawant: सावंत म्हणाले, देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात महात्मा गांधी यांचे कार्य मोलाचे आहे. त्यांच्या विचारामुळेच पंतप्रधान मोदी यांनी ‘आत्मनिर्भर भारत’ आणि आम्ही ‘स्वयंपूर्ण गोवा’ असा नारा दिला आहे.

Sameer Panditrao

पणजी: महात्मा गांधींनी आपल्या विचारांतून जगाला सत्य, अहिंसा आणि शांततेचा मार्ग दाखविला. त्यांनी दिलेल्या या तत्त्वज्ञानावर चालणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे मत मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी व्यक्त केले.

महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त जुने गोवे येथे सरकारने आयोजित केलेल्या अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते. गांधी चौकातील महात्मा गांधींच्या पुतळ्यास आणि लाल बहादूर शास्त्रींच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून त्यांनी अभिवादन केले.

याप्रसंगी केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक, आमदार राजेश फळदेसाई, मुख्य सचिव डॉ. व्ही. कंदवेलू, उत्तर गोवा जिल्हाधिकारी अंकित यादव, उत्‍तर गोवा जिल्हा पंचायत सदस्य सिद्धेश नाईक, धाकू मडकईकर यांच्यासह इतर मान्यवरांची उपस्थिती होती.

सावंत म्हणाले, देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात महात्मा गांधी यांचे कार्य मोलाचे आहे. त्यांच्या विचारामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘आत्मनिर्भर भारत’ आणि राज्यात आम्ही ‘स्वयंपूर्ण गोवा’ असा नारा दिला आहे.

‘गांधीजींचे स्वप्न सत्यात आणण्याचे प्रयत्न’

केंद्रातील आणि राज्यातील योजना स्वयंपूर्णमित्र काम करीत आहेत. राज्यातील योजना शंभर टक्के राबविण्यात यशस्वी झालो आहोत. आम्ही विविध योजना लोकांपर्यंत नेल्या आहेत. ‘माझे घर’ योजनेचा शुभारंभ शनिवारी होणार आहे. ही योजना यशस्वी झाल्यास घरात सुख लाभणार आहे. ‘गावांचा विकास’ हे गांधींनी पाहिलेले स्वप्नही आम्ही सत्यात आणण्याचे काम करीत आहोत, मुख्यमंत्री सावंत म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cyber Fraud: गोव्यातील व्हिलांमधून 900 कोटींचे कथित सायबर रॅकेट! मुंबई पोलिसांची कारवाई; 22 जणांना अटक

Goa Liberation Day: मुक्तिदिनापूर्वी सर्व मुंडकार प्रकरणे निकाली काढणार! CM सावंतांची घोषणा; रवी नाईक यांच्या वारसदाराबाबत मौन

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

SCROLL FOR NEXT