Ponda  Dainik Gomantak
गोवा

Ponda News : ‘फादर’ टीमचा मंत्र्यांच्या हस्ते गाैरव

Ponda News : स्वागत व प्रास्ताविक युगांक नाईक यांनी केले. त्यानंतर सर्व रंगकर्मींना स्मृती चिन्ह तसेच गुलाब पुष्प देऊन मंत्री गोविंद गावडे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

गोमन्तक डिजिटल टीम

Ponda News :

फोंडा गोवा कला अकादमी आणि महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेत अव्वल क्रमांक पटकावल्याबद्दल मांगिरिश युथ क्लब निर्मित ‘फादर’ या नाटकातील कलाकार व तंत्रज्ञांचा प्रियोळ प्रगती मंचतर्फे कला संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

रविवारी झालेल्या या कार्यक्रमाला गोविंद गावडे यांच्या समवेत मांगिरिश यूथ क्लबचे अध्यक्ष तथा जिल्हा पंचायत सदस्य दामोदर नाईक, वेलिंग सरपंच हर्षा गावडे तसेच प्रियोळ प्रगती मंचचे अध्यक्ष युगांक नाईक उपस्थित होते.

यावेळी गोविंद गावडे यांनी गोमंतकीय कलाकार जगाच्या पाठीवर कुठेही गेला तरी चमकतो ते आपल्या कलाकौशल्याच्या बळावर, असे सांगून नाट्यपरंपरा अबाधित ठेवण्यासाठी आज युवा पिढी पुढे सरसावली आहे ते पाहून समाधान वाटत असल्याचे नमूद केले.

‘फादर’ नाटकाच्या दिदर्शिका दक्षा शिरोडकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना एखादे नाटक उभारताना येणाऱ्या अडचणींवर प्रकाश टाकला. राज्य सरकारने अव्वल ठरलेले नाटक जास्तीत जास्त लोकांसमोर जावे, यासाही सहकार्य करणाची मागणी केली.

स्वागत व प्रास्ताविक युगांक नाईक यांनी केले. त्यानंतर सर्व रंगकर्मींना स्मृती चिन्ह तसेच गुलाब पुष्प देऊन मंत्री गोविंद गावडे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 5th T20: भारत-वेस्ट इंडिजमध्ये मालिकेसाठी आरपारची लढाई! पाचव्या टी-20 साठी प्लेइंग-11 मध्ये कोणाला मिळणार संधी, कोणाचा पत्ता कट होणार?

Tarun Tejpal Case: तेजपालच्या याचिकांवरील सुनावणी 3 नोव्हेंबरला; जन्मठेपेच्या मागणीवरही लक्ष

Goa Water Conservation: उधळपट्टी टाळू, उद्यासाठी पाणी वाचवू! गोव्याच्या जलसुरक्षेसाठी प्रत्येक थेंबाचा हिशेब हवा

संघातून बाहेर काढलं, तरी हार मानली नाही! जिद्द, मेहनतीच्या जोरावर जॅक कॅलिस बनला क्रिकेटविश्वातील महान अष्टपैलू; ठोकल्या 25,000हून अधिक धावा, घेतल्या 577 विकेट्स

Student Financial Assistance: गोमंतकीय विद्यार्थ्यांना सरकारची मोठी भेट! IIT, IIM, AIIMSमध्ये प्रवेश मिळाल्यास 1 लाखांची शिष्यवृत्ती

SCROLL FOR NEXT