Devendra Fadanvis Dainik Gomantak
गोवा

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शनिवारी गोवा दौऱ्यावर, नड्डांची गैरहजेरी काढणार भरुन

Devendra Fadanvis Goa Visit: गोवा भाजपच्या वतीने फोंडा पणजी बायपास मार्गावर चिंबल येथे भाजप मुख्यालयाची उभारणी केली जात आहे.

Pramod Yadav

Devendra Fadanvis Goa Visit

पणजी: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या (शनिवारी, २४ ऑगस्ट) एक दिवसीय गोवा दौऱ्यावर येणार आहेत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा नियोजित दौरा रद्द झाल्याने त्यांच्या जागी देवेंद्र फडणवीस गोव्यात येणार आहेत. गोवा भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी पत्रकार परिषदेद्वारे याबाबत माहिती दिली.

भाजपच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेला प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांच्यासह माजी खासदार नरेंद्र सावईकर, आमदार संकल्प आमोणकर, भाजप नेते दामू नाईक हे उपस्थित होते.

गोवा भाजपच्या वतीने फोंडा पणजी बायपास मार्गावर चिंबल येथे भाजप मुख्यालयाची उभारणी केली जात आहे. या मुख्यालयाची शनिवारी (दि. २४ ऑगस्ट) भाजप केंद्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या हस्ते केली जाणार होती. दरम्यान, नड्डा यांच्या दिल्लीत महत्वाच्या बैठका असल्याने कार्यक्रमात बदल करण्यात आला आहे.

जे. पी. नड्डा यांच्या ऐवजी आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भाजप मुख्यायलयाची पायाभरणी केली जाणार आहे, अशी माहिती तानावडे यांनी दिली. या कार्यक्रमासाठी फडणवीस शनिवारी गोव्यात असतील.

मंत्रिमंडळ फेरबदलांच्या चर्चांना तात्पुराता ब्रेक!

राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा गोव्यात आल्यानंतर राज्यातील मंत्रिमंडळ फेरबदलाबाबत चर्चा होईल, अशी माहिती समोर आली होती. नड्डा मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि प्रदेशाध्यक्ष तानावडे यांच्या चर्चा करतील. त्यानंतरच फेरबदलाबाबत निर्णय घेतला जाईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती.

दरम्यान, नड्डा यांच्या ऐवजी आता देवेंद्र फडणवीस गोव्यात येणार असल्याने आता फेरबदलांच्या चर्चांना तात्पुराता ब्रेक मिळाला असल्याचे दिसून येते. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी काही दिवसांपूर्वी फेरबदलाची आवश्यता असल्याचे संकेत दिले होते. त्यानंतर मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चांना उधाण आले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health And Motor Insurance Price Cut: सर्वसामान्यांसाठी खूशखबर! स्वस्त होणार हेल्थ आणि मोटर इन्शुरन्स; अवाजवी कमिशनला लागणार लवकरच ब्रेक

Horoscope 25 Saptember 2026: धनलाभाचा प्रबळ योग आणि यशाचा मार्ग खुला! लाडक्या बाप्पाला निरोप देताना उजळणार 'या' राशींचं भाग्य; ग्रह-नक्षत्रांची मोठी उलथापालथ

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

SCROLL FOR NEXT