Shri Mahalasa Narayani Temple Dainik Gomantak
गोवा

Mahalasa Narayani Temple : ‘महालसा नारायणी’चा उद्यापासून जत्रोत्‍सव; अखंड नामस्मरण

विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

दैनिक गोमन्तक डिजिटल

श्रीक्षेत्र वरेण्यपूर, जुने म्हार्दोळ, वेर्णा येथील श्री महालसा नारायणी देवालय देवी आणि आनुषंगिक पंचायतन देवतांच्या प्रतिष्ठापनेचा अठरावा वर्धापनदिन उत्सव (जत्रोत्सव) श्री शके 1945 शोभन नाम संवत्सर, चैत्र कृष्णपक्ष षष्ठी, सप्तमी, अष्टमी, 11 एप्रिल ते 13 एप्रिलपर्यंत विविध धार्मिक व भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

मंगळवार ११ रोजी सकाळी ७ वा. श्री सातेरी महालसा नारायणी पंचिष्ट देवतांची पूजा, ८.३० वा. ‘शतकलश पूजन व शतकलशाभिषेक’ व १०.०० वा. ‘कुंकुमार्चन सेवा’, धार्मिक विधी, शतचंडी अनुष्ठान आरंभ. महानैवेद्य, आरती, मंत्रपुष्प, पसायदान. दुपारी १ वा. महाप्रसाद. संध्याकाळी ३.३० ते ५.४५ वा. भजनाचा कार्यक्रम (अशोक कोनाडकर आणि साथी, मांद्रे), ६.०० वा. पुराण व पालखी, ७.३० वा. आरती, मंत्रपुष्प, पावणी, तीर्थप्रसाद नंतर अल्पोपहार. रात्री ९.०० वा. श्री महालसा नारायणी शालेय विद्यार्थ्यांतर्फे विविधांगी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्‍यात येतील.

१२ रोजी सकाळी ७ ते १२ धार्मिक विधी, देवतांची पूजा, पाठवाचन व ९.०० वा. ‘कुंकुमार्चन सेवा’ दुपारी १२.०० वा. चोवीस तास अखंड नामस्मरण (संकीर्तन) आरंभ, दुपारी १२.३० वा. महानैवेद्य, आरती, मंत्रपुष्प, पसायदान, दुपारी १.०० वा. महाप्रसाद. संध्या. ६.०० वा. पुराण व पालखी. ७.३० वा. आरती, मंत्रपुष्प, पावणी तीर्थप्रसाद नंतर अल्पोपाहार. तसेच चोवीस तास अखंड नामस्मरण (संकीर्तन) सुरू राहणार आहे.

या चोवीस तास अखंड नामस्‍मरण(संकीर्तन या सहभागी होणारी भजनी पथके : श्री महालसा नारायणी भजनी मंडळ, वेर्णा, श्री गणपती पंचायतन बाल भजनी मंडळ वेर्णा, आर्ट ऑफ लीवींग, मडगांव, श्री. उदय गांवकर कला महिला भजनी मंडळ, कासावली, श्री मांगेरीश भजनी मंडळ, कुठ्ठाळी, श्री. उदय गांवकर कला पुरुष भजनी मंडळ, कासावली, पुतू नाईक आणि साथी मडगाव, मोरूडकर भजनी पथक हेडलॅन्ड सडा मुरगांव गोवा, कैलासगिरी भजनी मंडळ किरबाट नुवे, शुक्रवार भजनी मंडळ, श्री महालक्ष्मी बांदिवडे, फोंडा.

कृष्ण अष्टमी १३ रोजी सकाळी ७ ते १२ धार्मिक विधी, देवतांची पूजा, सकाळी ९.०० वा. ग्रहयज्ञ व ‘कुंकुमार्चन सेवा’. दुपारी १२.०० वा. हवन द्वारा शतचंडी अनुष्ठान सांगता, कुमारीपूजन, बलिदान, पूर्णाहुती चोवीस तास अखंड नामस्मरण (संकीर्तन)ची समाप्ती. १२.३० वा. महानैवेद्य, आरती, मंत्रपुष्प, पसायदान व प्रार्थना, दुपारी १.०० वा. महाप्रसाद. संध्याकाळी ३.३० ते ५.४५ वा. भजनाचा कार्यक्रम. (कुडचडे येथील श्रीमती आश्विनी जांबावलिकर प्रस्तुत भावगीत व भक्तिगीताचा संगीताचा कार्यक्रम ), संध्याकाळी ६.०० वा. पुराण व श्री नवदुर्गा दिंडी पथक बोरी यांच्‍यासमवेत पालखी उत्‍सव, ७.३० वा. आरती, मंत्रपुष्प, पावणी, तीर्थप्रसाद नंतर अल्पोपाहार. रात्री ठीक ९ वा. ‘विविधा’ हा कार्यक्रम सादर करण्‍यात येईल.

‘शतकलशपूजन व शतकलशाभिषेक’ या सेवेसाठी प्रत्येकी रु. २५१/- व कुंकुमार्चन सेवेसाठी रु. १००/- ची रीतसर पावती काढून इच्छूक भक्तगणांनी सेवेत सहभागी व्हावे, नाव नोंदणी देवालयाच्या कार्यालयात चालू आहे, असे श्री महालसा नारायणी देवालय समितीने कळविले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

SCROLL FOR NEXT