Vishwajit Rane : आरोग्य क्षेत्राचा कायापालट करण्यास कटिबद्ध

आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे : खडकीत आरोग्य शिबिरात 474 जणांना लाभ
Vishwajit Rane |Goa News
Vishwajit Rane |Goa News Dainik Gomantak
Published on
Updated on

जनसामान्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी आरोग्य खात्याचे प्रयत्न सुरू असून राज्यात आरोग्यविषयक सेवासुविधा उभारण्यात येत आहेत. आरोग्य क्षेत्राचा कायापालट करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत.

महिला, मुले, ज्येष्ठांच्या आरोग्यासाठी सतर्क राहणे आवश्‍यक आहे. त्यासाठी अशा ग्रामपातळीवरील आरोग्य शिबिरातून त्यांची नेमकी तपासणी केली जाते, त्यानुसार उपचारही करण्यात येतात, असे प्रतिपादन आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे यांनी खडकी येथे आरोग्य शिबिराच्या उद्‍घाटनप्रसंगी केले.

Vishwajit Rane |Goa News
Sanquelim Municipal Council Election 2023: साखळीत मुख्यमंत्र्यांनी केली कार्यकर्त्यांशी चर्चा

व्यासपीठावर वाळपई सरकारी आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. विकास नाईक, डॉ. श्याम काणकोणकर, डॉ. वैभव गाडगीळ, अकीब शेख, संयोजक विनोद शिंदे, आरोग्य संचालिका डॉ. गीता काकोडकर, डॉ. गीता देशमुख, डॉ. आदित्य, केदार रायकर, प्रशांत सूर्यवंशी, खोतोडाचे सरपंच नामदेव राणे, नंदिनी म्हाळशेकर, सलोनी गावकर, तसेच इतर पंच, नगरगाव जिल्हा पंचायत सदस्य राजेश्री काळे, श्रीराम हायस्कूलचे मुख्याध्यापक शिवाजी देसाई उपस्थित होते.

आरोग्यमंत्री पुढे राणे म्हणाले, गोव्यात नवीन प्रकल्प आणून व पायाभूत सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत. यातून रोजगार निर्माण होईल. याचा लाभ निश्‍चितच गोमंतकीयांना होणार आहे. महिलांना, युवकांना चांगला रोजगार देण्याचा प्रयत्न आहे.

गोव्यातील विविध स्थरावर असलेल्या आरोग्य क्षेत्रात सुविधा देण्याचा प्रयत्न आहे. सत्तरी,पेडणेपासून ते काणकोणपर्यंत सामान्य माणसांना आरोग्यविषयक चांगल्या सुविधा उपलब्ध करण्यावर शासनाचा भर आहे. सरकारच्या माध्यमातून जनतेच्या दारात आरोग्य सेवा देण्याचा आपला प्रयत्न आहे.

Vishwajit Rane |Goa News
Goa Electricity Department : ग्राहकांना वीज खात्याचा शॉक, महिन्याचं बिल एवढ्या टक्क्यांनी वाढणार

ग्रामीण भागाबरोबर शहरी भागातसुध्दा आरोग्याच्या माध्यमातून मोफत सेवा दिल्या जातात. तसेच विविध योजना मार्गी लावल्‍या जात आहेत. लोकांचे जीवनमान उंचावण्‍यासाठी विविध स्तरावर काम केले जात आहे. महिलांच्या आरोग्यावर जास्त भर देण्याचा प्रयत्न असून केंद्र सरकारच्या सहकार्याने राज्‍याच्‍या आरोग्य क्षेत्राचा कायापालट करण्‍यात केला जात आहे, असेही राणे म्हणाले.

गोव्याच्या आरोग्य क्षेत्रात अत्याधुनिक सुविधा उपलब्ध झालेल्या आहेत. यामुळे आज गोवा मेडिकल कॉलेजच्या एकूण कारभारावर जनतेचा विश्वास वाढलेला आहे. दररोज ‘जीएमसी’मध्ये उपचारासाठी रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. थोडक्यात यंत्रणेवर विश्वास वाढल्याचे यामधून सिद्ध होते असल्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी सांगितले.

सेवा-सुविधा

१. गोमेकॉत दंतचिकित्सा इस्पितळ नवे बांधण्यात आले असून उत्तम सुविधा आहेत.

२. वाळपईत सुपर स्पेशालिटी सुविधांसाठीआठवड्यातून दोन वेळा गोमेकॉतून डॉक्टर येतात.

३. गोव्यात चांगली सेवा व मोफत औषध दिले जाते, ही एक आरोग्यक्रांती आहे.

४. कॅन्सर रुग्णांसाठी केमोथेरपी देण्यासाठी विशेष कॅन्सर विभाग सुरू करणार.

५. ग्रामीण प्राथमिक आरोग्य केंद्रांचा दर्जाही वाढविण्यात येणार आहे.

६. एप्रिल १५ रोजी टाटा मेमोरियल हॉस्पिटलची ओपीडी सुरू करण्यात येणार आहे.

७. दीनदयाळ कार्डामुळे आरोग्य क्षेत्रात गरजूंना चांगली सुविधा उपलब्ध होतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com