Ponda Municipality Election 2023: शांतीनगरच्या झोपडपट्टीतील एकगठ्ठा मतांवर उमेदवारांची सारी भिस्त !

प्रभाग एकची स्थिती : झोपडपट्टी, उच्चभ्रू वस्तीचा मिलाफ असलेला भाग
Ponda Municipality
Ponda MunicipalityDainik Gomantak
Published on
Updated on

मिलिंद म्हाडगुत

फोंडा शहर हे सध्या झपाट्याने वाढत असलेले शहर. त्यातील शांतीनगर हा एक महत्त्वाचा भाग. एकीकडे उच्चभ्रू समाज तर दुसरीकडे झोपडपट्टी, अशी या भागाची स्थिती.

प्रभाग क्रमांक एक हा याच शांतीनगर भागातील एक प्रमुख प्रभाग. डॉ. घाणेकर यांच्या इस्पितळापासून सुरू झालेला हा प्रभाग नंतर डोंगरावर असलेल्या झोपडपट्टीपर्यंत पोहोचतो.

एकीकडे सदनिका व बंगल्याचे जाळे तर दुसरीकडे झोपडपट्टी असे या प्रभागाचे स्वरूप दिसून येते. ज्या उमेदवाराला झोपडपट्टीतील एक गठ्ठा मते पडतात तो निवडून येतो, असे इतिहास सांगतो.

डोंगरावर असलेले महादेवाचे देऊळ तसेच साईराज पार्क ही या प्रभागातील प्रमुख स्थाने. अर्चना डांगी या या प्रभागाच्या विद्यमान नगरसेविका. भाजपच्या प्रमुख कार्यकर्त्या म्हणून गणल्या जात असलेल्या डांगी या सध्या उपनगराध्यक्ष म्हणूनही कार्यरत आहेत.

Ponda Municipality
Goa MLA In Jammu and Kashmir: मंत्र्यांचे जम्मू-काश्मीरात देवीला साकडे! जनकल्याणाची प्रार्थना

गेल्या खेपेला त्यांनी या प्रभागातून काँग्रेस प्रणित आघाडीच्या चंद्रिका नाईक यांच्यावर केवळ नऊ मतांनी विजय प्राप्त केला होता.

त्यावेळी हा प्रभाग महिलांकरता राखीव झाल्यामुळे डांगी कुटुंबाचे प्रतिनिधित्व करत असलेल्या अर्चना यांना उमेदवारी मिळाली होती आणि भाजप, काँग्रेस व म.गो. मध्ये झालेल्या तिरंगी लढतीत अर्चना यांनी बाजी मारली होती. आता पुन्हा हा प्रभाग सर्वसाधारण गटाकरता खुला झाला आहे, त्यामुळे चुरस वाढली आहे.

यावेळी अर्चना निवडणूक लढवणार नसून त्यांच्या जागी त्यांचे दीर नंदकुमार हे निवडणूक लढवणार आहे. प्रभागाचा फेरफटका मारल्यास काही ठिकाणचा बकालपणा ठळकपणे नजरेत भरतो.

शहरी प्रभाग असूनही काही ठिकाणी या प्रभागावर ग्रामीण साज चढलेला दिसून येतो. त्याचप्रमाणे अरुंद रस्ते ही या प्रभागाची असलेली खासियतही लक्षात भरते.

साईराज पार्क ओलांडल्यावर या प्रभागाचे वेगळेच रूप आढळते. त्यामुळे एकीकडे ‘पॉश’ वस्ती तर दुसरीकडे बकालपणा असा या प्रभागाचा‘डबल रोल’ अधोरेखित होतो.

काही ठिकाणी गटारींवर लादी न घातल्यामुळे तिथला धोका नजरेत येतो इथे असलेली नगरपालिकेची बागही विकासापासून वंचित असल्यासारखी वाटते.

Ponda Municipality
Tigers Declining in Goa: चिंताजनक! गोव्यात वाघ होताहेत कमी; म्हादई, मोले अभयारण्यात वाघांच्या संख्येत घट...

वारखंडे व खडपाबांध इथे असलेली नगरपालिकेची उद्याने पाहिल्यास हे गार्डन बरेच मागासलेले वाटते. या प्रभागाच्या विकासाबाबत विद्यमान नगरसेविका व उपनगराध्यक्ष अर्चना डांगी यांच्याशी बातचीत केल्यावर त्यांनी गेल्या पाच वर्षात केलेल्या प्रभागाच्या विकासाबद्दल माहिती दिली.

तरीही व्यापक विकासाची गरज या प्रभागाला असल्याची जाणीव या प्रभागात फिरताना होते, एवढे मात्र खरे.

रॉय नाईक उतरणार निवडणूक रिंगणात

कृषी मंत्री तथा फोंड्याचे आमदार रवी नाईक यांचे दुसरे पुत्र रॉय हे या प्रभागातून निवडणूक लढवणार असून त्यांनी आपल्या प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे. सध्या त्यांच्याबरोबर युवकांची फौज फिरताना दिसते .

ते भाजप पॅनल तर्फे निवडणूक लढवणार असून काँग्रेस तसेच म. गो प्रणित रायझिंग फोंडा तर्फे कोण निवडणूक लढवणार हे अजून स्पष्ट झालेले नाही.

गेल्या पाच वर्षात गटारे, संरक्षक भिंती बांधण्याचे काम पूर्ण केले असून १९ लाख रुपये खर्च करून नाला बांधला आहे. तसेच आपल्या प्रभागातील काही गरजूना पेव्हर्स घालून व जाण्या-येण्याकरता वाट करून दिली.

आपल्याला या प्रभागात वन खात्याच्या मदतीने एक उद्यान करायचे होते, पण त्या जागेच्या मालकाने आक्षेप घेतल्यामुळे हे उद्यान अस्तित्वात येऊ शकले नाही, याची खंत आहे.

- अर्चना डांगी, नगरसेविका (प्रभाग एक)

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com