Mahadayi Water Dispute  Dainik Gomantak
गोवा

Mahadayi Water Dispute: आता आम्‍ही मागे हटणार नाही; गोव्याला कर्नाटकचा इशारा

बोम्मई यांची दर्पोक्‍ती : गोव्‍यात विरोधी पक्ष, 77 संस्था एकवटल्‍या; 26 रोजी बैठक

दैनिक गोमन्तक

Mahadayi Water Dispute: गोव्‍याने कितीही प्रयत्‍न केले तरी आम्‍हाला आता काहीच फरक पडत नाही. डीपीआरला मंजुरी मिळाल्‍यामुळे म्हादईचे काम सुरू केले जाईल. लवादाचा आदेश सर्वोच्च न्यायालयाएवढाच महत्त्वाचा आहे. आता आम्‍ही मागे हटणार नाही, असे वक्तव्‍य कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केले. त्‍यामुळे गोव्‍यात संतापाची लाट पसरली आहे.

दरम्‍यान, कर्नाटकातही डबल इंजीन सरकार आहे आणि ते भाजपचेच नेते आहेत. ज्या प्रकारे ते विधिमंडळाच्या निर्णयाचा अपमान करत आहेत, त्याबाबत आता मुख्यमंत्री डॉ. प्रमाेद सावंत यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी काँग्रेस आणि गोवा फॉरवर्डने केली आहे. येत्‍या 26 जानेवारीला विरोधकांनी महत्त्‍वपूर्ण बैठक बोलाविली आहे.

‘म्‍हादईचा लढा आम्‍हीच जिंकू’ असे मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत सांगत असले तरी कर्नाटकने प्रत्‍यक्ष कामाची तयारी सुरू केलेली आहे. त्‍यातच कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आज केलेले विधान गोव्‍याचे खच्चीकरण करणारे ठरले आहे.

  • म्हादई बचाव चळवळीच्या गाभा समितीची बैठक झाली असून आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी 26 जानेवारीला सर्व विरोधी राजकीय पक्षांसह या आंदोलनात सहभागी झालेल्या 77 बिगरसरकारी संस्था, पर्यावरणवादी कार्यकर्ते यांची बैठक बोलाविण्‍यात आलेली आहे.

  • आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी ही बैठक महत्त्वपूर्ण असून त्‍यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, आम आदमी पक्ष, गोवा फॉरवर्ड, शिवसेना, तृणमूल काँग्रेस या राजकीय पक्षांचे अध्यक्ष वा प्रतिनिधी सहभागी होतील.

  • बैठकीत फेब्रुवारीच्‍या पहिल्या आठवड्यात करावयाच्या आंदोलनाची दिशा, तालुका व गाव पातळीवरील जनजागृती सभा, इतर सांस्कृतिक, सामाजिक आणि वैचारिक घडामोडींची दिशा ठरविण्‍यात येणार आहे. याच बैठकीत ‘म्हादई बचाव’ आंदोलनाचे कार्यकर्तेही सहभागी हाेतील.

‘मलप्रभा’ प्रदूषित : सांडपाणी आणि कचरा व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष केल्यामुळे कर्नाटकात 17 नद्या दूषित झालेल्या आहेत. ताज्या आकडेवारीनुसार पाण्यात कोलिफॉर्म बॅक्टेरियाचे प्रमाण जास्त आहे. त्यात मलप्रभानदीचा समावेश आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने आकडेवारी जाहीर केली आहे.

‘म्हादई बचाव’ ही चळवळ बिगरराजकीय चळवळ आहे. आमचा या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा आहे. आम्ही आमची सर्व शक्ती या आंदोलनामागे लावू. - विजय सरदेसाई, गोवा फॉरवर्डचे नेते

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sri Lankan Cricketer Ban: आयसीसीची मोठी कारवाई! मॅच फिक्सिंग प्रकरणी श्रीलंकन खेळाडू दोषी; 5 वर्षांची घातली बंदी

Goa Beef Shortage: गोव्यातील गोमांस पुरवठा साखळीला ब्रेक, गोरक्षकांच्या कथित हल्ल्यांविरोधात महाराष्ट्र कर्नाटकात संप!

GST 2.0: जीएसटीच्या नव्या दरांची लवकरच घोषणा! सिगारेटवर द्यावा लागणार 40 टक्के कर; केंद्र सरकारचा नवा प्रस्ताव

Viral Video: पाकिस्तानी तरुणीची देशभक्ती पाहून लोक थक्क, स्वातंत्र्य दिनी गायलं 'भारतीय गाणं'; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल!

Honour Killing: डॉक्टर बहिणीची लहान भावानेच केली गोळ्या झाडून हत्या; थरकाप उडवणाऱ्या घटनेबाबत धक्कादायक खुलासा

SCROLL FOR NEXT