Madkai  Dainik Gomantak
गोवा

मडकईत गोव्याबाहेरील लोकांना रोजगार पण...

Goa: मडकई मतदारसंघातील समस्या अजूनही सुटलेल्या नाहीत.

दैनिक गोमन्तक

मडकई मतदारसंघातील समस्या अजूनही सुटलेल्या नाहीत. लोकांना प्रत्येक वेळी फोंडा आयडी किंवा बांबोळीतील इस्पितळात धाव घ्यावी लागत आहे. मडकईतील रस्त्यांची अतिशय दूर्दशा झाली असून रोजगाराचा कुठे पत्ताच नाही, अशा स्थितीत लोकांनी जगायचे तरी कसे, असा सवाल मडकईतील रेव्होल्युशनरी गोवन्सचे मडकई मतदारसंघातील उमेदवार तथा सामाजिक कार्यकर्ते प्रेमानंद गावडे यांनी केला आहे.

मडकईतील विविध समस्यांसंबंधी काल शनिवारी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेला परेश कुंडईकर तसेच शशिकांत गावडे व इतर उपस्थित होते. गावडे यांनी सांगितले की, मतदारसंघात प्राथमिक आरोग्य केंद्र आहे, पण या ठिकाणी आवश्‍यक सुविधा नसल्याने प्रत्येक वेळी फोंड्यातील आयडी किंवा बांबोळीतील गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या इस्पितळात जावे लागते.

मतदारसंघातील इतर ठिकाणची आरोग्य केंद्रांच्या वास्तूंची दयनीय अवस्था झाली आहे. मडकई मतदारसंघात कोणतीच विकासकामे झाली नसल्याने लोकांना वेठीस धरले जात असल्याचेही प्रेमानंद गावडे म्हणाले.

मडकई मतदारसंघात असलेल्या एकमेव औद्योगिक वसाहतीत 85 टक्के गोव्याबाहेरील लोकांना रोजगार मिळाला आहे. केवळ पंधरा टक्के गोमंतकीय या औद्योगिक वसाहतीत काम करतात, पण त्यांच्या रोजगाराची पूर्णतः खात्री नाही. त्यामुळे या औद्योगिक वसाहतीत स्थानिकांना रोजगार देण्यासाठी सरकार पातळीवर प्रयत्न व्हायला हवेत, असेही गावडे म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Accidents: गोव्यात रस्त्यावर गाडी हाकणे वा चालणे दिव्य ठरत आहे; अपघातांचे प्रमाण आणि रस्ता सुरक्षा सप्ताह

Mapusa Police Quarters: म्हापसा पोलिसांचे ‘क्वाटर्स’ मोडकळीस! ‘साबांखा’चे दुर्लक्ष; कर्मचाऱ्यांची गैरसोय

मुंबईतही सुरु होणार गोव्यासारखी पायलट सेवा! रिक्षा-टॅक्सीला पर्याय, दर खिशाला परवडणारा; माहिती घ्या

Mandrem: 'पर्यटन खाते लाखोंचे टेंडर देते, पैसा जातो कुठे'? कचऱ्यात बुडाले मांद्रेचे किनारे; स्थानिकांत संतापाची लाट

Goa Taxi: कर्नाटकातील ‘गोझो कॅब्स’ टॅक्सी गोव्यात? टॅक्‍सीमालकचा आरोप; कठोर कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT