Traffic in Panjim City
Traffic in Panjim CityDainik Gomantak

Goa Update|कॅसिनो आणि ‘काळरात्र’; खरी कुजबूज

पणजीत कॅसिनोसमोरची वाहतूक कोंडी हा चर्चेचा आणि वादाचा मुद्दा बनला आहे.

कॅसिनो आणि ‘काळरात्र’

पणजीत कॅसिनोसमोरची वाहतूक कोंडी हा चर्चेचा आणि वादाचा मुद्दा बनला आहे. वाहतूक पोलिस आणि पणजी महानगरपालिकेने त्‍याची वेळोवेळी दखल घेतली असली तरी ही समस्‍या सुटण्‍याचे काही नाव घेत नाहीय. दिवसभर तेथून वाहतूक सुरळीत सुरू असते, पण संध्याकाळनंतर चक्का जॅम होतो. विशेष म्‍हणजे ही कोंडी ती वाहतूक पोलिसांसमोर. रात्री अकरानंतर तर ही स्थिती अधिकच गंभीर बनते. त्‍यामुळे तेथून दुचाकी किंवा चारचाकी वाहनाने प्रवास करणे कठीण बनते. यामागे नक्की काय ‘अर्थ’ दडलाय हे मात्र समजत नाही. रात्री कॅसिनोमधील पर्यटक अधिक बेधुंद होतात आणि गाड्या बेदरकार चालवतात. त्‍यामुळे अपघाताही वाढले आहेत. यातून सामान्य प्रवाशांची कधी सुटका होणार, हे त्‍या देवालाच माहीत.

(traffic jam in front of Panajit Casino has become point of discussion and controversy)

Traffic in Panjim City
Goa Petrol Price|जाणून घ्या, गोव्यातील एक लिटर पेट्रोल आणि डिझेलचे दर

मडगावात काँग्रेसचे काय होणार?

अनंत चतुर्दशी आटोपली, अकरा दिवसांचा बाप्पा आपल्या घरी रवाना झाला. पण भाजपच्या वाटेवर असलेल्या काँग्रेस गटाचे विशेषतः मडगावच्या दिगंबरबाबचे मात्र सगळेच डळमळीत आहे. सध्या त्यांनी आपल्या डोळ्यासमोरून काँग्रेसचे नामोनिशाण दूर केले आहे. काँग्रेसच्या कोणत्याच कार्यक्रमात ते सहभागी होत नाहीत. यावरून त्यांचा निर्णय पक्का झाल्याचे स्पष्ट होते. विशेष म्‍हणजे त्यांचे समर्थक नगरसेवक, काँग्रेस गट समितीही त्यांच्याबरोबर आहे. त्यांनीही काँग्रेस पक्षाला सध्‍या दूरच ठेवले आहे. त्यामुळे बाबा उद्या भाजपमध्‍ये गेले तर मडगाव काँग्रेसमुक्त तर होणार नाही ना, अशी चर्चा ऐकायला मिळत आहे. ∙∙∙

‘कर्लिस’मधील फलक काय दर्शवितात?

कर्लिस बार ॲण्‍ड रेस्‍टॉरंट सध्या गोव्यातच नाहीतर देशभर चर्चेचा विषय बनला आहे. या शॅकवर बुलडोझर फिरण्यापूर्वी तो सुरू असताना जे लोक तेथे जाऊन आले, त्यांना त्याचे काही अप्रुप वाटले नसेल. परंतु या शॅकमध्ये प्रथमच ज्यांनी शॅक पाडतेवेळी पाय ठेवला, त्यांना मात्र येथील काही ठिकाणी लावलेले फलक चक्रावणारे दिसले. कारण ‘नो ड्रग्स’ म्हणून इंग्रजी शब्दातील हे फलक लावण्यामागचा काय उद्देश होता हे शॅकवरील कारवाईमुळे दिसून आले. ज्या ठिकाणी सिगारेट विकली जात नाही, असे लिहिले जाते, तेथेच ती विकली जाते. तसाच हा प्रकार. त्यामुळे या शॅकमध्ये ड्रग्स मिळतेय हे त्या फलकामागील गुपित असावे, असा संशय काही जणांनी व्यक्त केला. सध्या कर्लिसमधील हे फलक चर्चेचा विषय बनले आहेत, हे मात्र नक्की. ∙∙∙

खासदारकीसाठी फुटबॉल ‘डिप्लोमसी’

अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या निवडणुकीत अध्यक्षपदी दणदणीत फरकाने निवडून आलेले कल्याण चौबे हे पश्चिम बंगाल भाजपचे बडे पदाधिकारी आहेत. गोवा फुटबॉल संघटनेचे मतही त्यांनाच मिळाल्याचे स्पष्ट आहे. या निवडणुकीत गोवा संघटनेचे प्रतिनिधित्व वालंका आलेमाव यांनी केले. विधानसभेच्या निवडणुकीत चर्चिल आलेमाव यांची कन्या तृणमूल पक्षाच्या उमेदवार होत्या. त्यामुळे भुवया उंचावल्या आहेत. गोव्याचे मत चौबे यांना मिळावे यासाठी राज्यातील भाजप पदाधिकाऱ्यांनीही मोर्चेबांधणी केली होती. चौबे यांच्या अध्यक्षतेखालील फुटबॉल महासंघाच्या कार्यकारी समिती सदस्यपदी वालंका बिनविरोध ठरल्या. ‘फुटबॉल डिप्लोमसी’अंतर्गत चर्चिल आणि त्यांच्या कन्येने दोन वर्षांनी होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत दक्षिण गोव्यात भाजपला साथ द्यावी या प्रस्तावावर सहमती झाल्याची वंदता आहे. याकामी दक्षिण गोव्यातील खासदारकीचे इच्छुक उमेदवार मडगावजवळील मतदारसंघातील माजी आमदाराने पुढाकार घेतल्याचे सांगितले जाते. ∙∙∙

Traffic in Panjim City
Goa Lok Sabha Election| लोकसभेसाठी भाजपची आतापासूनच रणनीती; नारायण राणे

‘तो’ निधी कुठे गेला बाप्‍पालाच माहीत!

मडगाव पालिकेत नेमके काय घडते, ते ईश्वराला कळणेही कठीण असे म्हणतात. एवढे पाताळयंत्री लोक येथे आहेत. सध्या या पालिकेचा दीड दिवसांचा गणपती गाजत आहे. पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून वर्गणी काढून हा उत्सव केला जातो. पूर्वी हा उत्सव सात दिवसांचा होता. मात्र कोविडच्या काळात त्याचा कालावधी कमी झाला. यंदा कोविड नसतानाही बाप्पाचा दीड दिवसात ‘मोरया’ करण्यात आला. वास्तविक कर्मचाऱ्यांकडून जी वर्गणी घेतली होती, ती सात दिवसांच्या उत्सवासाठी होती. पण प्रत्यक्षात उत्सव झाला दीड दिवसाचा. बाकी पाच दिवसांच्या निधीचे काय झाले ते त्या बाप्पालाच ठावे! ∙∙∙

नद्यांचे पाणी लाल होतेच कसे?

दूधसागर आणि खांडेपार नदीचे पाणी अधूनमधून गढूळ, लाल होत असल्याने ओपा जलप्रकल्पावर व जलशुद्धीकरण प्रक्रियेवर विपरित परिणाम होत आहे. नळांनाही गढूळ पाणी येण्याचा प्रकार घडला आहे. मात्र या नद्यांचे पाणी ठराविक काळातच गढूळ कसे होते हा प्रश्‍‍नच आहे. कोण म्हणते कर्नाटकात मोठा पाऊस झाला की हे गढूळ पाणी येते, कोण म्हणते कोडली येथील खनिज प्रकल्पातून गढूळ पाणी सोडले जाते, तर कोण म्हणते पावसामुळे नदीकिनारी असलेल्या खनिज मालाच्या डंपमुळे नद्यांचे पाणी लाल होते. आता हे तपासायचे कुणी? प्रदूषण नियंत्रण मंडळाने आपल्या परीने ओपा नदीच्या पाण्याचे नमुने तपासणीसाठी नेले आहेत. आता निष्कर्ष काय असेल कुणास ठाऊक? पण लोकांच्या जीवाशी खेळण्याचा हा मात्र हा प्रकार आहे. एखादी समिती नेमून या प्रकाराची चौकशी करायला नको का? म्हणजे ‘तसे’ काही असेल तर उघड होईल आणि नसेल तर काही लोक गप्प तरी बसतील! ∙∙∙

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com