Madgaon Market Dainik Gomantak
गोवा

मडगावात विनापरवाना व्यवसायांवर कारवाई होणार

पालिकेचा परवाना न घेता चालू असलेल्या व्यवसायांवर कारवाईचे संकेत

दैनिक गोमन्तक

मडगाव : मडगाव नगरपालिकेकडून अधिकृत परवाना नसताना बेकायदेशीर व्यवसाय करण्याऱ्या व्यवसायिकांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी मडगाव नगरपालिकेचे अधिकारी जाणार आहेत. तपासणीनंतर या विषयी अहवाल दहा दिवसांच्या आत सादर करण्याचे निर्देश नगरपालिकेचे मुख्याधिकारी आग्नेल फर्नांडिस यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.

विनापरवाना आस्थापनांमध्ये पेट्रोलपंप, बँकांची (Bank) एटीएम मशीन्ससाठी भाडेपट्टीवर घेतलेली आस्थापने, शैक्षणिक संस्थांसहित इतर व्यावसायिकांचाही समावेश आहे. या बेकायदेशीर व्यावसायिकांना दहा दिवसांच्या आत कागदपत्रे नगरपालिकेत सादर करावी लागणार आहेत.
यासोबतच भाडे तत्वावर असलेल्या काही दुकानदारांनी साईन बोर्ड, जाहिरातीचा कर, अधिकृत परवाना नसताना आपली आस्थापने खुली ठेवली आहेत. त्यांचाही अहवाल सादर करावा असे निर्देशही नगरपालिकेचे मुख्याधिकारी आग्नेल फर्नांडिस यांनी दिले आहेत.

दरम्यान मडगाव (Madgaon) रेल्वे स्टेशन मार्गावर दुतर्फा फळे, भाजी विक्री करणारे हातगाडेवाले दुकानमालकांना अडथळा ठरत असल्याने ठराविक वेळेसाठी हातगाडे वाल्यांना प्रतिबंध करण्यात आला आहे.
या ठिकाणी रेल्वे (Railway) स्टेशनकडे जाण्याच्या रस्त्यावर सकाळपासून रात्रीपर्यंत मोठ्या संख्येने हातगाडीवाले आपला व्यवसाय करत असतात. त्यामुळे रस्त्याच्या शेजारी असलेल्या दुकानदारांना ग्राहक येण्यास अडथळा निर्माण होत असल्याचं चित्र आहे. त्यामुळे नगरपालिकेने या हातगाडेवाल्यांना दुपारी 1 ते 3 आणि संध्याकाळी 6 ते रात्री 8 पर्यंत हातगाडे लावण्यात प्रतिबंध केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT