गोवा लवकरच 'मास्क फ्री' राज्य होणार, मुख्यमंत्री प्रमाेद सावंत

जिल्हाधिकारी अधिसूचना जारी करतील, मुख्यमंत्री
goa will soon be a mask free state collector will issue notification chief minister sawant
goa will soon be a mask free state collector will issue notification chief minister sawant Dainik Gomantak
Published on
Updated on

बुधवारी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गोवा लवकरच 'मास्क फ्री' राज्य होणार असल्याची घोषणा केली. सक्रिय COVID-19 प्रकरणांमध्ये घट लक्षात घेता गोवा (goa) स्वतःला 'मास्क फ्री' राज्य म्हणून घोषित करेल का असे विचारले असता मुख्यमंत्र्यांनी (CM) होकारार्थी उत्तर दिले.

याबाबत जिल्हाधिकारी अधिसूचना जारी करतील

गोव्यात गेल्या 24 तासांत केवळ चार नवीन कोविड (COVID-19) रुग्ण आढळले असून, राज्यातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या आता 41 वर पोहोचली आहे. गेल्या काही महिन्यांत कोविड प्रकरणांमध्ये एकमात्र वाढ गेल्या आठवड्यात एका शैक्षणिक संस्थेत नोंदवली गेली जिथे 24 पॉझिटिव्ह प्रकरणे आढळून आली.

goa will soon be a mask free state collector will issue notification chief minister sawant
दूधसागर पर्यटन क्षेत्रासाठी मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय, केला 'हा' संकल्प

दरम्यान, यापुढे मुंबईत (Mumbai) कोणी मास्क (Mask) घालायला विसरला किंवा मास्क घरातच ठेवला तर दंडात्मक कारवाई होणार नाही. मुंबई महापालिकेने (BMC) मार्शल आणि कर्मचाऱ्यांना मास्कबाबत कठोर कारवाई न करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र , कोरोना नियमांच्या प्रोटोकॉलमध्ये मास्क काढण्याबाबत कोणतीही सूचना देण्यात आलेली नाही. मास्क न घालणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याऐवजी लोकांना मास्क घालण्यासाठी प्रोत्साहित केले जाईल, असे सांगण्यात येत आहे. पण मिळालेल्या माहितीनुसार, आता मास्क न घातल्यास दंड किंवा अन्य कोणतीही कारवाई होणार नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com