Viriato Fernandes Birthday Video Dainik Gomantak
गोवा

Viral Video: खासदार कॅप्टन विरियातोंना राहुल गांधीनी दिलं Birthday Surprise; प्रियंका गांधींचीही हजेरी

Viriato Fernandes Birthday Video: विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी खासदार कॅप्टन विरियातो यांचा वाढदिवस त्यांच्या कार्यालयात साजरा केला.

Pramod Yadav

नवी दिल्ली: दक्षिण गोव्याचे काँग्रेस खासदार विरियातो फर्नांडिस यांनी ०४ फेब्रुवारी रोजी ५६ वा वाढदिवस साजरा केला. लोकसेभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी विरियातो सध्या दिल्लीत असून, दिल्लीतच त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. विशेष बाब म्हणजे खुद्द विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी यावेळी विरियातो यांच्या वाढदिवसाला हजेरी लावली.

राहुल गांधी यांच्या कार्यालयात विरियातो यांच्या वाढदिवासाचा केक कापण्यात आला. यावेळी आणखी दोन काँग्रेस नेत्यांचा देखील वाढदिवस साजरा करण्यात आला. खासदार प्रियंका गांधी यांनी देखील यावेळी हजेरी लावली होती. वाढदिवासाच्या सोहळ्याचा व्हिडिओ खासदार विरियातो यांनी त्यांच्या Instagram वरुन शेअर केला आहे.

"विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी माझ्यासह इतर नेत्यांच्या वाढदिवस त्यांच्या कार्यालयात साजरा केला. यावेळी खासदार प्रियंका गांधी यांनी देखील हजर होत्या. अविस्मरणीय!", अशा शब्दात विरियातो यांनी व्हिडिओ शेअर करत भावना व्यक्त केल्या.

यापूर्वी विरियातो यांनी अर्थसंकल्पातून गोव्याला काहीच मिळाले नसल्याचा दावा करत भाजप सरकारवर टीका केली. विरियातो यांनी बेरोजगारी, शेतकऱ्यांबाबत प्रश्न उपस्थित केला.

"गोव्यासाठी तुमचा काय प्लान आहे. गोव्यात लाखो एकर जमीनीचे रूपांतर केले जात आहे. शेतीचे रुपांतर होत आहे. आमच्या नद्या आमच्याकडून काढून घेतल्या जात आहेत. राज्यात बेरोजगारीचा दर अधिक आहे. कॅश फॉर जॉब स्कॅममुळे अक्षम तरुणांना पैशाच्या जोरावर नोकरी मिळत असून, सक्षम तरुण बेरोजगार म्हणून फिरतायेत. हाच तुमचा अमृतकाळ आहे का?", असा सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदींना विरियातोंना विचारला.

विरियातो यांनी गोव्यासाठी अमृतकाळ म्हणून काय नियोजन केले आहे?, असा सवाल उपस्थित केला. अर्थसंकल्पातून अतिश्रीमंत लोकांसाठी सुविधा देण्याचे काम केले असून, मध्यमवर्गीय लोकांसाठी ठोस तरदूत केली नाही. तसेच, पर्यटनासाठी देखील काही नियोजन केले नसल्याचा आरोप विरियातो यांनी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

Goa News Live: ओपा जल शुद्धीकरण प्रकल्पाजवळ ट्रक दरीत कोसळला

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT