Goa News: 'आमचो दोतोर' ॲप वरून करा मुख्यमंत्र्यांशी थेट संवाद; जाणून घ्या नोकरीच्या संधी आणि योजनांची माहिती

CM Pramod Sawant: गोव्यातील जनतेला मुख्यमंत्र्यांशी थेट संपर्क करता यावा म्हणून गोवा सरकारकडून 'आमचो दोतोर' हे नवीन ॲप सुरु करण्यात आलेय.
Amcho Dotor App
Amcho Dotor AppDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोव्यातील जनतेला मुख्यमंत्र्यांशी थेट संपर्क करता यावा म्हणून गोवा सरकारकडून 'आमचो दोतोर' हे नवीन ॲप सुरु करण्यात आलेय. गोव्यातील जनता हे ॲप आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करू शकते, ज्यावर त्यांना राज्य सरकारकडून राबवल्या जाणाऱ्या योजना, नोकरीच्या संधी तसेच इतर महत्वाची माहिती दिली जाणार आहे.

गोमंतकीय जनतेचे प्रश्न मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचावे म्हणून मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून डॉ. प्रमोद सावंत अनेक योजना राबवत आहेत. यापूर्वी दूरदर्शनवर हॅलो गोंयकार नावाचा कार्यक्रम दर शुक्रवारी प्रदर्शित केला जायचा. या कार्यक्रमात मुख्यमंत्री स्थानिकांच्या प्रश्नांवर तोडगा काढायचे, त्यांच्याशी थेट संपर्क साधायचे.

Amcho Dotor App
CM Pramod Sawant: 30 मे पर्यंत गोव्यात कुणीही निरक्षर राहणार नाही; परप्रांतीयांना देखील सामावून घेणार, मुख्यमंत्र्यांची ग्वाही

खूपच कमी काळात या कार्यक्रमाने लोकांचा भरगोस प्रतिसाद मिळवला होता आणि आता राज्यातील जनांतेची खुशाली जाणून घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आमचो दोतोर हे नवीन ॲप सुरु केले आहे.

गोमंतकीय या ॲपचा वापर करून थेट मुख्यमंत्र्यांशी संपर्क करू शकतात. गावातील तसेच शहरातील प्रत्येकाला मदत मिळावी म्हणून हा प्रयत्न हाती घेतला गेलाय. शिवाय तळागाळातील जनतेला सरकारकडून पुरेपूर मदत मिळावी म्हणून सरकारचे प्रयत्न सुरु आहेत आणि यासाठीच म्हणून सध्या गोव्यातील आमचो दोतोर नावाचा ॲप तयार केला आहे. या नवीन ॲपचा वापर करून गोव्यातील जनता राज्य सरकारच्या विविध योजनांबद्दलची माहिती एका क्लिकवर मिळवू शकणार आहे, शिवाय राज्यातील प्रशासनबरोबर थेट संपर्क करणं देखील त्यांच्यासाठी सोपं होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com