Boats Dainik Gomantak
गोवा

Benaulim: 'होड्या ठेवायला जागा द्या'! बाणावलीच्‍या मच्‍छीमारांची मागणी; पावसात किनाऱ्यावर धोका वाढल्याचा दावा

Benaulim Fisherman: स्‍थानिक मच्‍छीमार जुझे फर्नांडिस यांनी यावेळी सांगितले की, पूर्वी आम्‍ही पावसाळ्यात आमच्‍या होड्या किनाऱ्यावर आणून ठेवायचो.

Sameer Panditrao

मडगाव: सध्‍या गोव्‍यात मासेमारी बंदी लागू झालेली असताना बाणावलीच्‍या स्‍थानिक मच्‍छीमारांनी आपल्‍या होड्या किनाऱ्यावर आणून ठेवल्‍या आहेत. या होड्या मच्‍छीमार खात्‍याच्‍या जागेत आणून ठेवण्‍याची परवानगी स्‍थानिकांना द्यावी अशी मागणी आज स्‍थानिक मच्‍छीमारांनी केली.

स्‍थानिक मच्‍छीमार जुझे फर्नांडिस यांनी यावेळी सांगितले की, पूर्वी आम्‍ही पावसाळ्यात आमच्‍या होड्या किनाऱ्यावर आणून ठेवायचो. मात्र, हल्‍लीच्‍या दिवसांत दर्यात वादळे होऊन पाणी किनाऱ्यावर वरपर्यंत येण्‍याच्‍या घटना कित्‍येकदा घडल्‍या आहेत.

त्‍यामुळे किनाऱ्यावर या होड्या ठेवणे धाेक्‍याचे बनले आहे. त्‍यामुळे मच्‍छीमार खात्‍याची जी जमीन आहे त्‍यातील ५ हजार चौ.मी. जागा आम्‍हाला होड्या ठेवण्‍यास द्यावी, अशी मागणी यापूर्वी मुख्‍यमंत्र्यांकडे केली होती आणि त्‍यांनी ही मागणी मान्‍य करण्‍याचे आश्‍वासन दिले. मुख्‍यमंत्र्यांनी दिलेले हे आश्‍वासन आता पाळावे, अशी आमची अपेक्षा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Surya Grahan 2026: वर्षाचं पहिलं सूर्यग्रहण 'या' दिवशी! 17 फेब्रुवारीला दिसणार 'रिंग ऑफ फायर'; जाणून घ्या ग्रहणाची वेळ, सूतक काळ अन् तुमच्या राशीवर होणारा परिणाम

Goa Cyber Crime: गुंतवणूकीतून ज्यादा परताव्याचं आमिष, गोव्यातील एकाला 67 लाखांचा गंडा; केरळच्या भामट्याला बेड्या

दहशतवाद्यांचे हायटेक 'फंडिंग'! पाकिस्तानात 300 नवे ट्रेनिंग कॅम्प सुरु; 'जैश'ने सरकारी सिस्टीममधूनच गोळा केले 1.4 कोटी डॉलर्स

IND VS PAK: क्रिकेटचं सर्वात मोठं नुकसान! 2,200,000,000 रुपये पाण्यात; भारत-पाक सामन्याच्या रद्द होण्यानं ICCच्या तिजोरीला भगदाड

India Pakistan Water Dispute: "आम्ही उत्तरासाठी बांधील नाही" सिंधू जल करारावर भारताचं 'नो कॉम्प्रमाईज' धोरण; पाकिस्तानच्या कुरापतींना चोख प्रत्युत्तर

SCROLL FOR NEXT