Benaulim: होड्या काढून घ्‍या, अन्‍यथा जप्‍त करू! मच्‍छीमार खात्‍याची नोटीस; बाणावलीतील स्थानिक हतबल

Benaulim fishing boats: समुद्र किनाऱ्यावर मच्‍छीमार खात्‍याकडील ५ हजार चौ. मी. जागा होड्या ठेवण्‍यासाठी उपलब्‍ध करून द्यावी, अशी मागणी सरकारकडे करण्‍यात आली आहे.
Benaulim fishing boats
Goa fishing boatsDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: बाणावली येथील मच्‍छीमार ज्‍या खासगी जागेत आपल्‍या पारंपरिक होड्या उभ्या करून ठेवतात त्‍या जागेत ठेवलेल्‍या होड्या काढून घेण्‍याची नोटीस मच्‍छीमार खात्‍याने जारी केल्‍याने येत्या पावसाळ्यात या पारंपरिक होड्या कुठे ठेवाव्‍यात हा प्रश्न मच्‍छीमारांसमोर आ वासून उभा आहे.

समुद्र किनाऱ्यावर मच्‍छीमार खात्‍याकडील ५ हजार चौ. मी. जागा होड्या ठेवण्‍यासाठी उपलब्‍ध करून द्यावी, अशी मागणी सरकारकडे करण्‍यात आली आहे. फर्नांडिस यांनी दिलेल्‍या माहितीप्रमाणे, बाणावलीत एकूण १२४ मच्‍छीमारांच्‍या होड्या असून यातील ९४ होड्या मच्‍छीमार खात्‍याकडे नोंद झालेल्‍या आहेत.

यापैकी ९ होड्या खासगी जागेत पार्क करण्‍यात आल्‍या होत्‍या, पण या जागेच्या मालकाने आपल्‍या जागेवर अतिक्रमण केल्‍याची तक्रार मच्‍छीमार खात्‍याकडे केली होती. त्‍यानंतर या ९ हाेडी मालकांना या जागेवरील होड्या काढून घ्‍याव्‍यात अन्‍यथा त्‍या मच्‍छीमार खात्‍याकडून जप्‍त करण्‍यात येतील अशा आशयाची नाेटीस आलेली आहे. या समस्‍येवर आता कायमस्‍वरूपी तोडगा काढण्‍याची गरज आहे, असे फर्नांडिस यांनी सांगितले.

Benaulim fishing boats
Benaulim: बाणावलीतील नष्ट झालेला नैसर्गिक झरा वाहू लागला! वॉरन आलेमाव यांच्या पुढाकारामुळे काम पूर्ण; गावकऱ्यांत आनंद

लवकर निर्णय घेण्याचे आश्वासन

बाणावलीच्‍या मच्‍छीमारांच्‍या प्रतिनिधींनी आज पणजी येथे जाऊन मच्‍छीमार खात्‍याच्‍या संचालकांची भेट घेण्‍याचा प्रयत्‍न केला. मात्र, संचालक अन्‍य कामात व्‍यस्‍त असल्‍याने ते त्‍यांना भेटू शकले नाहीत. यासंदर्भात आज आम्‍ही इतर अधिकाऱ्यांकडे चर्चा केली. या जागेची पाहणी करून आवश्‍‍यक तो निर्णय लवकर घेण्‍यात येईल, असे आश्वासन आम्‍हाला मच्‍छीमार खात्‍याच्‍या अधिकाऱ्यांनी दिले आहे, असे यावेळी मच्‍छीमारांचे प्रतिनिधी पेले फर्नांडिस यांनी सांगितले.

Benaulim fishing boats
Pakistani Fisherman: दुर्मिळ माशाने पाकिस्तानी मच्छिमाऱ्याला बनवले 'करोडपती', रातोरात पालटले नशीब

‘मुख्‍यमंत्र्यांनी आश्वासनाची पूर्तता करावी’

मच्‍छीमार खात्‍याच्‍या मालकीच्‍या जमिनीतील जागा स्‍थानिक मच्‍छीमारांसाठी उपलब्‍ध करून दिली जाईल, असे आश्वासन मुख्‍यमंत्री प्रमोद सावंत यांनी आम्‍हाला दिले होते. त्‍या आश्वासनाची आता पूर्तता मुख्‍यमंत्र्यांनी करावी, अशी मागणी पेले ‍यांनी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com