Electric Pole Dainik Gomantak
गोवा

Electrocution: सत्तरीत वीजेचा धक्का लागून लाईनमनचा मृत्यू, दुसरा कर्मचारी जखमी

Goa News: चंद्रू यांना साखळीच्या रुग्णालयात दाखल केले असता त्यांना मृत घोषित करण्यात आले. तर, सर्वेश यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत.

Pramod Yadav

सत्तरी: होंडा येथे मान्सूनपूर्वी देखभालीचे काम करताना वीजेचा झटका लागून गोवा विद्युत विभागाच्या लाईनमनचा मृत्यू झाला असून, दुसरा एक कर्मचारी जखमी झाला आहे. मंगळवारी (२० मे) दुपारी साडे बारा - एकच्या सुमारास ही घटना घडली.

चंद्रू गांवकर (मोर्ले, सत्तरी) असे या वीजेचा धक्का लागून मृत्यू झालेल्या लाईनमनचे नाव आहे. तर, सर्वेश गांवकर असे जखमी कर्मचाऱ्याचे नाव आहे. सर्वेश वीज खांबावरुन खाली कोसळून जखमी झाला होता. चंद्रू यांना साखळीच्या रुग्णालयात दाखल केले असता त्यांना मृत घोषित करण्यात आले. तर, सर्वेश यांच्यावर सध्या उपचार सुरु असून, त्यांची तब्येत स्थिर असल्याची माहिती मिळतेय.

मिळालेल्या अधिकच्या माहितीनुसार, चंद्रू आणि सर्वेश दोघेही देखभालीच्या कामासाठी पोस्ट वाडा, होंडा येथील वीजेच्या खांबावर चढले होते. देखभालीच्या कामानिमित्त या भागात शटटाऊन देखील घेण्यात आला होता अशी माहिती समोर येतेय. पण, चंद्रू यांना वीजेचा धक्का लागला आणि त्याचा मृत्यू झाला. तर, सर्वेश हे खाली कोसळून जखमी झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dashank Yog 2026: पगारवाढ अन् पदोन्नतीचा सुवर्णकाळ! 1 जूनला आकाशात घडणार मोठी उलथापालथ; 'दशांक योग' पालटणार 5 राशींचं नशीब

"त्या 15 वर्षांच्या मुलीच्या वेदनांची कल्पना करा!" सरन्यायाधीश सूर्यकांत भावूक; अत्याचार पीडितेचा गर्भपात रोखण्याची मागणी सुप्रीम कोर्टानं धुडकावली

Water Standards Goa: नळातून शुद्धच पाणी यावे! - संपादकीय

VIDEO: "भारत आयटीसाठी तर पाकिस्तान दहशतवादासाठी ओळखला जातो", राजनाथ सिंह यांनी पाकड्यांचा पुन्हा फाडला बुरखा; 'ऑपरेशन सिंदूर'बाबत मोठा खुलासा

खरी कुजबुज: विषारी कचऱ्यातून मिळणार मुक्ती!

SCROLL FOR NEXT