Water Shortage in Bardez Dainik Gomantak
गोवा

Water Shortage in Bardez: कालवा दुरूस्तीच्या कामामुळे बार्देश तालुक्यात मर्यादीत पाणी पुरवठा

कालवा दुरूस्तीच्या कामामुळे अस्नोडा व पर्वरी जलशुध्दीकरण प्रकल्पांना तिलारी धरणातून सोडण्यात येणारा कच्च्या पाण्याचा पुरवठा बंद करण्यात आला आहे.

Kavya Powar

Water Shortage in Bardez: कालवा दुरूस्तीच्या कामामुळे अस्नोडा व पर्वरी जलशुध्दीकरण प्रकल्पांना तिलारी धरणातून सोडण्यात येणारा कच्च्या पाण्याचा पुरवठा बंद करण्यात आला आहे. यामुळे हा पुरवठा पूर्वरत होई पर्यंत बार्देश तालुक्यात मर्यादीत पाणी पुरवठा असणार आहे.

सोमवारी 13 नोव्हेंबर रोजी पासून तिलारी धरण जलसिंचन विभागाकडून धरणाच्या नादुरूस्त झालेल्या कालव्यांचे दुरूस्ती काम हाती घेतले आहे. यामुळे तिलारीच्या पाण्यावर अवलंबून असणार अस्नोडा व पर्वरी जलशुध्दीकरण प्रकल्पाला कच्च्या पाण्याचा पुरवठा बंद झाला आहे.

सध्या सरकारच्या जलस्त्रोत खात्यातर्फे आमठाणे धरणाचे पाणी अस्नोडा जलशुध्दीकरण प्रकल्पाला देण्यात आले आहे. पण पर्वरी जलशुध्दीकरण प्रकल्प पुर्णता तिलारीच्या पाण्यावर अवलंबून असल्यामुळे या प्रकल्पावर परिणाम होणार आहे.

कच्च्या पाण्याच्या कमतेरतेमुळे साबांखाच्या पाणी पुरवठा विभागाने या तालुक्यात तिलारीचा पाणी पुरवठा पुर्वरत होई, पर्यंत सोमवार दि. 13 पासून बार्देश तालुक्याला मर्यादीत पाणी पुरवठा होईल तसेच पाणी पुरवठ्याच्या वेळापत्रकात बदल होणार असल्याची सार्वजनिक सूचना जारी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT