Pernem Container Accident
Pernem Container AccidentDainik Gomantak

Pernem Container Accident: गुरांना वाचवण्याच्या नादात मासळीवाहू कंटेनरचा अपघात!

राष्ट्रीय महामार्ग 66 वर अपघात
Published on

Pernem Container Accident: राज्यातील अपघातांची मालिका काही केल्या थांबण्याचे नाव घेत नाही. मालपे येथे आज सकाळी एका मासळी कंटेनरचा भीषण अपघात झाला. सदर कंटेनर केरळमधील रजिस्टर आहे. आज पहाटे 4 च्या सुमारास हा अपघात घडला.

हा कंटेनर राष्ट्रीय महामार्ग 66 महाराष्ट्र रस्त्यावरून जात असताना रस्त्यात अचानक गुरे आल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. गुरांना वाचवण्याच्या नादात कंटेनर रस्त्याच्या एका बाजूला कलंडला.

यामध्ये कंटेनरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच यामध्ये असलेल्या मासळीचेही नुकसान झाले आहे. सुदैवाने चालक सुरक्षित असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, पेडणे पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com