Leopard terror in Mardol area  Dainik Gomantak
गोवा

Goa: म्हार्दोळ भागात बिबट्याची दहशत

ग्रामस्थांत भीती: पिंजरा लावण्याची मागणी

दैनिक गोमन्तक

मडकई: बागवाडा - सीमेपाईण म्हार्दोळ भागात पंधरवड्याभरापूर्वी बिबट्या सापडल्याने या परिसरात घबराट पसरली होती. जखमी अवस्थेतील तो बिबट्या मरण पावला असला तरी आता अन्य बिबट्यांच्या डरकाळ्या झरीवाडा-प्रियोळ परिसरात ऐकू येण्याबरोबरच येथील घरांच्या जवळ तसेच रस्त्यावर दर्शनही काही ग्रामस्थांना झाल्याने हा परिसर आता भीतीच्या छायेत आहे.

याप्रकरणी वन खात्याला माहिती देण्यात आली असून खात्याच्या अधिकाऱ्यांना या भागात येऊन पाहणीही केली आहे. या बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी वन खात्याने या परिसरात पिंजरा लावावा, अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे. (Leopard terror in Mardol area)

बागवाडा - सीमेपाईण म्हार्दोळ येथे बिबट्याचे प्रकरण झाल्यानंतर येथील लोकांनी सुटकेचा सुस्कारा सोडला होता, पण गेल्या आठवड्याभरात म्हार्दोळ - सीमेपाईण मंगेशीच्या डोंगर भागात डरकाळ्या ऐकू येऊ लागल्याने बिबट्यांचा वावर परिसरात असल्याचे पुन्हा स्पष्ट झाले आहे. शिवाय परिसरातील कुत्रे नाहिशी झाल्याचे येथील ग्रामस्थ रमेश गावडे यांनी सांगितले. त्यातच बुधवारी रात्री साडेनऊच्या सुमारास झरीवाडा - प्रियोळ येथील एक ग्रामस्थ सुनील गावडे यांच्या घराच्या मागे प्रत्यक्ष बिबट्या दिसल्याने या कुटुंबाची घाबरगुंडी उडाली.

पथदीप नसल्याने अधिकच धोका

या परिसरात पथदीप नसल्याने परिसरातील लोकांना बिबट्यांपासून अधिकच धोका निर्माण झाला आहे. रात्रीच्यावेळी हा परिसर अंधारात असतो. पथदीप लावण्यासाठी सातत्याने मागणी करावी लागते, अशी तक्रार खुद्द पंचायत सदस्यांकडून करण्यात येते. वीज खात्याने याप्रकरणी त्वरित लक्ष देऊन या परिसरातील अंधार दूर करावा, अशीही मागणी होत आहे.

बिबट्यांपासून या परिसरात अतिशय धोका निर्माण झाला आहे. बागवाडा येथे बिबट्या सापडल्यानंतर लोक भयमुक्त झाले होते, पण अजूनही बिबट्यांचे दर्शन होत असल्याने येथील लोक घाबरले आहेत.

- हरिश्‍चंद्र जल्मी (पंचसदस्य, वेलिंग प्रियोळ कुंकळ्ये पंचायत)

झरीवाडा - प्रियोळ येथे खुद्द आमच्या घराच्या मागे बिबटा दिसल्याने परिसरात भीती पसरली आहे. रात्रीच्यावेळी हा बिबटा दिसल्याने आता बाहेर पडणेही धोक्याचे वाटत आहे. वन खात्याला याप्रकरणी कळवल्यानंतर त्यांनी या भागात येऊन पाहणी केली, पण बिबट्या सापडू शकलेला नाही. किमान तीन बिबटे या परिसरात फिरत असावेत, असा कयास आहे. त्यामुळे वन खात्याने या बिबट्यांना पकडण्यासाठी पिंजरा लावावा आणि लोकांना भयमुक्त करावे.

- सुनील गावडे (स्थानिक ग्रामस्थ, झरीवाडा - प्रियोळ)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT