शाळा परिसरातील तंबाखूजन्य दुकानांवर नजर

तंबाखूजन्य पदार्थांवर निर्बंध: बालहक्क आयोगाचे संस्थांना आवाहन
Ban For Tobacco
Ban For Tobacco Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: राज्यातील किशोरवयीन मुले तसेच विद्यार्थी हे मद्य, सिगारेट तसेच ड्रग्सच्या आहारी जात असल्याने त्याची विक्री शाळा परिसरात नको. या प्रकरणाची दखल घेत बाल हक्क आयोगाने शिक्षण संस्थांच्या जवळपास तंबाखूजन्य पदार्थ तसेच मद्यविक्री करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

शिक्षण संस्था तसेच कोचिंग क्लासेस असलेल्या परिसरात अनेक दुकानांतून मद्य, सिगारेट व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री केली जाते. त्यामुळे विद्यार्थी त्याकडे आकर्षित होतात.

Ban For Tobacco
गोव्यात पोलिओ लसीकरण मोहीमेअंतर्गत 98254 मुलांना मिळाले 'दो बूंद जिंदगी की'

शिक्षण संस्थांनीही देखरेख ठेवावी

किशोरवयीनांचे भवितव्य मद्य, सिगारेट व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन केल्याने उद्‍ध्वस्त होत आहे. यावर आळा घालण्यासाठी शाळेच्या परिसरात असलेल्या दुकानांवर नजर ठेवण्याची गरज आहे. अशी वाईट व्यसने मुलांना लागू नयेत म्हणून आवश्‍यक खबरदारी घेण्याची गरज आहे. शिक्षण संस्थांनीही विद्यार्थ्यांवर देखरेख ठेवावी, असे आवाहन आयोगाने केले आहे.

Ban For Tobacco
गोवा खंडपीठाचा 'हा' निर्णय आमदारांना पक्षांतर करण्याचा मुक्त परवाना देणारा

संयुक्त कृती आराखडा

राष्ट्रीय बालहक्क आयोगाने नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या मदतीने मुलांना व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी संयुक्त कृती आराखडा तयार केला आहे. या आराखड्यासंदर्भात हल्लीच बैठक झाली होती. याची अंमलबजावणी राज्यातच नव्हे, तर देशपातळीवर केली जाईल, असे आयोगाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Calangute Police Mobile Theft Arrest
Margao Woman Cheated 33 lakhs
GMC cardiology department staff protest
ED Raids Goa Delhi Karnal
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com