बांधकाम बंद न केल्यास आंदोलन करू: पीडित जनसंघटना

मोपा लिंक रोड: आंदोलकांचे रास्तो रोको आंदोलन स्थगित
construction protest
construction protest Dainik Gomantak
Published on
Updated on

पेडणे: उपजिल्हाधिकारी राजेश आजगावकर यांच्या आश्वासनानंतर मोपा लिंक रोडच्या विरोधात मोपा विमानतळ पंचक्रोशी पीडित जनसंघटनेने पुकारलेले रास्तारोको आंदोलन आज निषेध सभेनंतर स्थगित केले. मात्र, हे काम 24 तासांच्या आत बंद केले नाही, तर पेडणे पोलिस ठाण्यात धरणे आंदोलन करू, असा इशारा मोपा विमानतळ पंचक्रोशी पीडित जनसंघटने दिला.

construction protest
ISL football tournament : एटीके मोहन बागानला उपांत्य फेरीत गाठण्याची जास्त संधी

मोपा लिंक रोडसाठी बेकायदेशीररीत्या जमीन बळकावून काम सुरु करण्यात आले आहे. यामुळे काजू बागायती व इतर उत्पादनाची साधने नष्ट होत आहेत. वारखंड नागझर ग्रामपंचायतीने याबाबत हे काम बंद पाडण्याची नोटीस दिलेली असतानाही भू संपादन अधिकारी चंद्रकांत शेटकर यांनी पंचायतीला आम्ही जुमानत नाही. उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयाचाही आदेश आम्हाला लागत नाही असे सांगत बंद केलेले काम सुरू केले व शेतकऱ्यांना काम बंद करण्याचा प्रयत्न कराल तर पश्चाताप कराल अशी धमकी दिली होती. या पाश्वर्भूमीवर ही निषेध सभा आयोजित केली होती.

construction protest
एसीजीएल कामगार पगारवाढ प्रश्न मिटण्याची शक्यता

यावेळी आंदोलकांनी ‘चंद्रकांत शेटकर को हटावो’, ‘चंद्रकांत शेटकर मुर्दाबाद’, ‘एक दो, एक दो चंद्रकांत शेटकर को फेक दो’ अशा जोरदार घोषणा दिल्या. निषेध सभेनंतर उपजिल्हाधिकारी राजेश आजगावकर यांनी येऊन आंदोलकांची भेट घेतली. यावेळी ॲड. प्रसाद शहापूरकर, ॲड. जितेंद्र गावकर, व्यंकटेश नाईक, संजय बर्डे, सरपंच संजय तुळसकर यांनी ग्रामपंचायत ही घटनेचे मूळ आहे, त्याचा आदेश तुम्ही कुठल्या आधारावर नाकारता, उच्च न्यायालय व सुप्रीम कोर्टाचा आदेश तुम्ही कुठल्या आधारावर नाकारता असे त्यांना प्रश्न केले.

पंचायतीच्या नोटीसीनंतर भू संपादन अधिकारी चंद्रकांत शेटकर व तुम्ही येऊन बंद केलेले काम सुरू केले. ते बांधकाम चोवीस तासांच्या आत बंद करा अन्यथा येथील शेतकरी व ग्रामस्थ पेडणे पोलिस ठाण्यात बसून धरणे धरतील असा इशारा यावेळी आंदोलनकर्त्यांनी उपजिल्हाधिकारी राजेश आजगावकर यांना दिला.

तत्पूर्वी झालेल्या निषेध सभेत गोंयचो आवाज संघटनेचे उपाध्यक्ष रोशन माथायश म्हणाले, की शेती, काजू बागायती ही आमची खरी श्रीमंती आहे. त्यावर अनेक कुटुंबे उदरनिर्वाह करतात, पण हे सरकार रिअल इस्टेटमधील व भू माफिया आहे. सरकार शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावून लोकांना देशोधडीला लावणार असून आम्ही संघटीतपणे लढा द्यायाला हवा.

निवृत्त मुख्याध्यापक दयानंद मांद्रेकर म्हणाले, की बेकायदेशीरपणे शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावणारे हे सरकार खोटारडे, अत्याचारी व दृष्ट आहे. कुठल्याही खात्याची परवानगी न घेता लोकांच्या उदरनिर्वाहाचे साधन असलेल्या लोकांच्या जमिनी बेकायदेशीरपणे बळकावल्या जात आहेत.

व्यंकटेश नाईक म्हणाले, की घराला जोडून चार चिरे लावले, तर आम्हाला ग्रामपंचायतीची कायदेशीर परवानगी घ्यावी लागते, पण कुठलीही परवानगी न घेता, भू संपादन प्रक्रिया न करता सगळे कायदे गुंडाळून बेकायदेशीरपणे लोकांच्या पोटावर पाय ठेवून या लिंक रोडचे काम सुरू आहे. लोकशाहीचा पाया असलेल्या ग्रामपंचायतीला हे उद्दाम अधिकारी जुमानत नाहीत. त्यांना लोकशक्ती दाखविण्याची वेळ आलेली आहे.

construction protest
मतदारांचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास उडाला; गिरीश चोडणकर

शैलेंद्र वेलिंगकर म्हणाले, की गेल्या पंधरा वर्षांत विकासाच्या नावावर पर्यावरणाचा विद्‍ध्वंस केला आहे. निसर्गाने संपन्न अशा पेडणे तालुक्याच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे तो आम्ही संघटीतपणे लढूया.

सुदेश तिवरेकर, संजय बर्डे, ॲड. जितेंद्र गावकर, रेखा परब, उदय महाले, करिश्मा गाड, भास्कर नारुलकर, पंचायत सदस्य मंदार परब, वॉल्टर लोबो, वृषाली तुळसकर, रुक्मिणी तुळसकर यांचीही यावेळी भाषणे झाली.

‘जमिनी आमच्या, काम मात्र दुसऱ्यांना’

उपजिल्हाधिकारी आपली बाजू ऐकण्यास येत नाहीत म्हणून आंदोलकांनी रास्ता रोको आंदोलन केल्यावर विमानतळाच्या बांधकामावर जाणारे ट्रक व इतर वाहतूक बंद झाली. यावेळी बहुतांश ट्रक व वाहने ही राज्याबाहेरील होती. याचा उल्लेख करून अनेक वक्त्यांनी जमिनी आमच्या गेल्या, पण विमानतळ प्रकल्पात ट्रक व इतर वाहनांसह काम मात्र दुसऱ्यांना दिला गेला याबद्दल जोरदार टीका केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com