Leopard suspicious death in mardol Dainik Gomantak
गोवा

म्हार्दोळमध्ये घरात घुसलेल्या बिबट्याचा संशयास्पद मृत्यू

मानेवर जखमा आढळल्याने संशय बळावला, वनविभागाचे चौकशीचे आदेश

आदित्य जोशी

फोंडा : म्हार्दोळ परिसरात घराशेजारी असलेल्या खोपट्यामध्ये घुसलेल्या बिबट्याचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. बिबट्या भरवस्तीत घुसल्याने एकच खळबळ उडाली होती. बिबट्याच्या वावरामुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. बिबट्याचं दर्शन होताच वनविभागाला घटनेची माहिती देण्यात आली. बिबट्याला जेरबंद केल्यानंतर काहीवेळातच त्याचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. सकाळपासूनच या बिबट्याला पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. (Leopard suspicious death in mardol News Updates)

बागवाडा सिमेपाईण म्हार्दोळ (Mhardol) येथील रामदास नाईक यांच्या घराला लागून असलेल्या लाकूड साठा केलेल्या खोपटीत बिबट्या लपून बसला होता. सकाळी रामदास देवपूजा करण्यासाठी फुले काढण्यासाठी गेले असता हा बिबट्या (Leopard) खोपटीत निवांत पडलेला दिसल्याने त्यांची चांगलीच घाबरगुंडी उडाली. त्यांनी लगेच परिसरातील इतरांना याबाबत माहिती दिली आणि पोलीस तसेच वन खात्याला कळवण्यात आले.

बिबट्या आढळल्याने हा परिसर सील करण्यात आला होता. वन (Forest) खात्याचे अधिकारी आणि कर्मचारी जाळे, गुंगीचे इंजेक्शन यासारखे साहित्य घेऊन घटनास्थळी आले आणि त्यांनी बिबट्याला जेरबंद केलं. बिबट्याने परिसरातील कुत्र्याची तीन पिल्ले फस्त केल्याची माहिती स्थानिकांनी दिली. कुत्र्याला पकडण्यासाठीच हा बिबट्या भर लोकवस्तीत आला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. बिबट्याच्या मानेवर जखमा दिसल्याने त्याच्या मृत्यूचा संशय बळावला आहे. वनविभागाने याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT