Leopard In Goa DDainik Gomantak
गोवा

Leopard In Goa: फाशात अडकलेल्या बिबट्याची सुटका; बोंडला वन्यजीव अभयारण्यात रवानगी

Ponda: दयानंदनगर-धारबांदोडा येथील संजीवनी साखर कारखान्याच्या मागील भागात रानटी प्राण्यांना पकडण्यासाठी लावण्यात आलेल्या फासात अडकलेल्या बिबट्याची वन खात्याच्या पथकाने यशस्वी सुटका केली.

गोमंतक ऑनलाईन टीम

फोंडा : दयानंदनगर-धारबांदोडा येथील संजीवनी साखर कारखान्याच्या मागील भागात रानटी प्राण्यांना पकडण्यासाठी लावण्यात आलेल्या फासात अडकलेल्या बिबट्याची वन खात्याच्या पथकाने यशस्वी सुटका केली. सुटकेनंतर त्याला वैद्यकीय तपासणीसाठी व पुढील देखरेखीकरिता बोंडला वन्यजीव अभयारण्य येथे हलविण्यात आले.

माहितीनुसार, परिसरातील काजू बागायती भागात अज्ञात व्यक्तींनी रानटी प्राण्यांची शिकार करण्याच्या उद्देशाने फासे लावले होते. शनिवारी सकाळी सुमारे साडेअकराच्या सुमारास स्थानिकांना एका फासात बिबट्या अडकल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ फोंडा वनविभागाशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली.

वन अधिकाऱ्यांचे पथक त्वरित घटनास्थळी दाखल झाले. परिस्थितीचा आढावा घेत आवश्यक ती खबरदारी बाळगून बिबट्याला सुरक्षितरीत्या बेशुद्ध करण्यात आले आणि फासातून मुक्त करण्यात आले. प्राथमिक तपासणीत त्याच्या मान व पुढील पायाला किरकोळ जखमा आढळून आल्या. उपचारासाठी व निरीक्षणाखाली ठेवण्यासाठी त्याची रवानगी बोंडला येथे करण्यात आली.

दरम्यान, संबंधित भागात बेकायदेशीररीत्या फासे लावणाऱ्यांचा शोध सुरू असून अशा प्रकारांविरोधात कठोर कारवाई केली जाणार असल्याचे वन विभागाने स्पष्ट केले आहे. जंगल परिसरात सापळे लावणे हा कायद्याने दंडनीय गुन्हा असल्याने नागरिकांनी सतर्क राहून तात्काळ माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: 'त्या' नराधम बापाला कोर्टाचा मोठा दणका! अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी ठोठावली 20 वर्षांची शिक्षा; 1.30 लाखांचा दंड

Telangana Accident: किंकाळ्या अन् आक्रोश! अनियंत्रित बसची कंटेनरला जोरदार धडक, 6 ठार, 20 जखमी; तेलंगणात भीषण अपघात

Goa Drug Racket: आशा, रोविनानंतर आता पोक्सो कैदी योगेश मांद्रेकरही अटकेत; कोलवाळ जेल ड्रग्स प्रकरणात तिसरी कारवाई

Goa Municipal Elections: विधानसभेपूर्वीच पालिका निवडणुका! 11 नगरपालिकांसाठी कोर्टाचा मोठा आदेश, 4 जानेवारीपर्यंत निकाल

Operation Sindoor: ''शेवटचा वार भारताचाच असणार होता''!, 'ऑपरेशन सिंदूर'बाबत माजी CDS अनिल चौहान यांचा धक्कादायक खुलासा; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानची दैना VIDEO

SCROLL FOR NEXT