

मडगाव: मत्स्यगंधा रेल्वेतून प्रवास करणाऱ्या एका महिलेची बॅग पळवून नेत साडेचार लाखांचा ऐवज लंपास केल्याची घटना ५ फेब्रुवारी रोजी घडली होती. याप्रकरणी मूळ मुबंईतील गोरेगाव येथील वृंदा पै यांनी शुक्रवारी (ता. २०) कोकण रेल्वे पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली.
पोलिसानी भारतीय न्याय संहितेच्या ३०५ (क) कलमाखाली अज्ञातावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक राहूल नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विप्लव वस्त पुढील तपास करीत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार पै या लोकमान्य टिळक टर्मिनल येथून कुमठा दरम्यान प्रवास करीत होत्या. रत्नागिरी येथून रेल्वे पुढील प्रवासाला निघाली असता पै या झोपी गेल्या होत्या.
नेमकी हीच संधी हेरून चोरट्याने त्यांची बॅग पळविली. बॅगेत मंगळसूत्र, मोबाईल, १६०० रुपये, आधारकार्ड ,डेबिट कार्ड व अन्य वस्तू मिळून ४ लाख ५१ हजार, ६०० रुपयांचा ऐवज होता. सध्या पोलिस रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेज पडताळून पाहत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.