Leopard Dainik Gomantak
गोवा

Leopard Caught: लोकवस्तीत येऊन कुत्र्यांचा, पाडसांचा फडशा पाडणारा बिबट्या जेरबंद! वनखात्याच्या प्रयत्नांना अखेर यश

Leopard Attack: लोकवस्तीत येऊन कुत्र्यांचा तसेच गायी, म्हशींच्या पाडसांचा फडशा पाडणारा बिबट्या वन खात्याने लावलेल्या पिंजऱ्यात अडकला. फडशा पाडून त्याने दहशत निर्माण केली होती.

Sameer Panditrao

पेडणे: तुये गावातील विविध भागात रात्रीच्यावेळी लोकवस्तीत येऊन कुत्र्यांचा तसेच गायी, म्हशींच्या पाडसांचा फडशा पाडणारा बिबट्या काल (३ रोजी) मध्यरात्री वन खात्याने लावलेल्या पिंजऱ्यात अडकला. गेले काही दिवस पाळीव कुत्र्यांचा तसेच पाडसांचा फडशा पाडून परिसरात त्याने दहशत निर्माण केली होती.

या बिबट्याचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांच्याकडे केली होती. वन खात्याने काही ठिकाणी या बिबट्याला पकडण्यासाठी सापळे लावले होते, पण त्याला प्रतिसाद मिळत नव्हता. मात्र, काल रात्री हा बिबटा पिंजऱ्यात अडकला. बिबट्याची रवानगी बोंडला येथील अभयारण्यात करण्यात येणार आहे.

वन खात्याने बिबट्याला सापळ्यात पकडल्याबद्दल आमदार जीत आरोलकर यांनी समाधान व्यक्त करताना सांगितले, की गोव्यात सर्वत्र बिगर गोमंतकीय बिबट्यांचे प्रमाण वाढले आहे.

त्यांनी आपली दहशत सुरू केलेली आहे. खरी चूक आमचीच आहे. आम्ही जर डोंगर राने विकत राहिलो आणि ते नष्ट करीत राहिलो, तर रानातल्या या प्राण्यांनी रहायचे कुठे आणि खायचे काय?

डोंगर, राने वाचवा; आरोलकर

डोंगर नष्ट होत असल्याने हे प्राणी लोकवस्तीत येत आहेत. यासाठी आम्ही वन खाते किंवा आणि कुणाला दोष देऊ शकत नाही. सध्या हे बिबटे कुत्रे, गुरांना येऊन खातात. कुत्रे, गुरे खाऊन संपल्यानंतर ते माणसांना खाऊ लागतील. यासंबंधीचा प्रश्न मी विधानसभेत उपस्थित केला होता. निदान आता उरलेसुरले डोंगर, राने वाचवण्यासाठी आम्ही प्रयत्न केले पाहिजे, असे आमदार जीत आरोलकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: मंगळ करणार 'त्रिगुणी संचार'!! सुरु होणार धन, सुख आणि समृद्धीचा प्रवाह; 3 राशींना मिळणार फायदा

Canacona: रायींमध्ये देवत्व लाभलेला, दूधसागरकडे जाताना लक्ष वेधून घेणारा 'मधुवृक्ष जर्माल'

Cluster University Goa: एकेकाळी 'गोवा युनिव्हर्सिटी'ला केंद्रीय दर्जा देण्याची चर्चा चालली होती; क्लस्टर विद्यापीठांची संकल्पना

Goa Live News: भाजप गोवा राज्य संघटनात्मक कार्यशाळेला म्हापसा येथे सुरुवात

Narve: नार्वेच्या पंचगंगेच्या तीरावर भरली ‘अष्टमीची’ जत्रा; भरपावसातही भक्तीचा उत्साह

SCROLL FOR NEXT