Leopard In Goa: बिबट्या आला रे... विलीयण सांगे येथे भरवस्तीत बिबट्याची एन्ट्री, वन विभागानं केलं जेरबंद

Leopard In Sanguem: राज्यातील विविध भागांमध्ये वन्यप्राण्यांचा वावर वाढला असून, यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे आणि बागायतींचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. विलीयण सांगे येथे घराजवळ तसंच रस्त्यांवर बिबट्याचा मुक्त संचार पाहायला मिळाला.
Leopard In Goa
Leopard In GoaDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: राज्यातील विविध भागांमध्ये वन्यप्राण्यांचा वावर वाढला असून, यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे आणि बागायतींचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. अशातच आता भरवस्तीत बिबट्यासारख्या मोठ्या वन्यप्राण्यांचा वावर वाढल्याचं पाहायला मिळत आहे. विलीयण सांगे येथे घराजवळ तसंच रस्त्यांवर बिबट्याचा मुक्त संचार पाहायला मिळाला.

भरवस्तीत बिबट्या मुक्तपणे संचार करत असल्याचं समोर आलं आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालंय. विलीयण सांगे येथे घराजवळ तसंच रस्त्यांवर बिबट्याचा मुक्त संचार पाहायला मिळाला.

घटनेची माहिती मिळताच वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी तातडीने धाव घेतली आणि कारवाई करत या बिबट्याला जेरबंद करण्यात यश मिळवलं. या थरारक घटनेचे दृश्य कॅमेऱ्यात कैद झालं आहे.

Leopard In Goa
Goa Drowning Death: दुर्दैवी! हॉटेलच्या स्विमिंग पूलमध्ये बुडून 5 वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू; हडफडे येथील घटना

वन्यप्राण्यांचा वावर वाढला

राज्यातील विविध भागांत वन्यप्राणी शेती, बागायतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करत आहेत. याशिवाय, बिबट्यासारखे धोकादायक प्राणी आता थेट लोकवस्तीमध्येही फिरताना दिसत आहेत. वन्यप्राण्यांचा मानवी वस्तीत वावर वाढल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

काही दिवसांपूर्वी कोने-प्रियोळ परिसरात वाहनाच्या धडकेत एका दुर्मीळ ब्लॅक पॅन्थरचा मृत्यू झाला होता. या घटनेची गंभीर दखल घेत राज्याचे वनमंत्री विश्वजीत राणे यांनी संबंधित वन अधिकाऱ्यांना तातडीनं सखोल चौकशी करून संपूर्ण सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

Leopard In Goa
Goa Government Jobs: पुढील 2 वर्षांत 10 हजार सरकारी नोकऱ्या! मुख्‍यमंत्र्यांचा पुनरुच्‍चार; दहावी, बारावी अनुत्तीर्णांनाही मिळणार लाभ

वन्यप्राण्यांचा लोकवस्तीत वाढता वावर ही अतिशय चिंतेची बाब बनली आहे. नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने तसेच वन्यप्राण्यांच्या दृष्टीनेही तातडीने प्रभावी उपाययोजनांची गरज आहे. बिबट्या किंवा इतर प्राणी गावात येऊ नयेत यासाठी वन खात्याने तातडीने कार्यवाही करणं आवश्यक आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com