Two Shops Gutted In Fire At Mapusa Dainik Gomantak
गोवा

Mapusa Fire: म्हापसा येथे भीषण आगीत दोन दुकाने जळून खाक; 32 लाखांचे नुकसान

म्हापसा अग्निशामक दलाने आणि स्थानिकांनी या भीषण आगीवर नियंत्रण मिळविले

Rajat Sawant

Two Shops Gutted In Fire At Mapusa: हाऊसिंग बोर्ड म्हापसा येथे लॉंड्री तसेच स्टेशनरीचे गाळेवजा दुकानाला आग लागल्याची घटना शनिवारी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास घडली. या आगीत अंदाजे 32 लाखांचे नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे.

म्हापसा अग्निशामक दलाचे जवान आणि स्थानिकांच्या मदतीने या भीषण आगीवर नियंत्रण मिळविण्यात दलाला यश आले. शॉर्ट सर्किटच्या कारणाने आग लागल्याची माहिती अग्निशामक दलाच्या जवानांनी दिली.

अग्निशामक दलाच्या जवानांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास हाऊसिंग बोर्ड म्हापसा येथे लॉंड्री तसेच स्टेशनरीचे गाळेवजा दुकानाला भीषण आग लागली. घटनेची माहिती स्थानिकांनी अग्निशामक दलाला व पोलिसांना दिली.

दलाचे जवान व पोलिस घटनास्थळी दाखल झाले. आगीची तीव्रता अधिक असल्याने पर्वरी अग्निशामक दलाच्या जवानांनाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले.

जवानांनी पाण्याचा मारा करीत दोन्ही दुकानांना लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळविले. मात्र भीषण आगीत दुकाने जळून खाक झाली. आगीत अंदाजे 32 लाखांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली. सुदैवाने या आगीत जीवितहानी झाली नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT