Marina Project: सांतआंद्रे मतदारसंघातील मरिना प्रकल्पाच्या विरोधात दसऱ्याला सभा : वीरेश बोरकर

Marina Project: सांतआंद्रे मतदारसंघातील नावशी येथील प्रस्तावित मरीना प्रकल्पाला पर्यावरण दाखल्याची आवश्यकता नसल्याचे केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्रालयालाने जाहीर केल्यानंतर पुन्हा एकदा वातावरण तापले आहे.
Marina Project
Marina ProjectDainik Gomantak

Marina Project: सांतआंद्रे मतदारसंघातील नावशी येथील प्रस्तावित मरीना प्रकल्पाला पर्यावरण दाखल्याची आवश्यकता नसल्याचे केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्रालयालाने जाहीर केल्यानंतर पुन्हा एकदा वातावरण तापले आहे.

Marina Project
Youth Trekker: साद घालती उंच शिखरे!

प्रकल्प रद्द न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा आमदार वीरेश बोरकर यांनी दिला आहे. बोरकर यांनी आज नावशी येथे दारोदारी जाऊन लोकांची भेट घेतली. सरकार मरीनावरून लोकांची दिशाभूल करीत आहे. प्रकल्प आल्यास आम्ही आंदोलन करणार आहोत. प्रथम या दसऱ्याला जाहीर सभा होणार आहे.

सरकाराकडून फसवणूक

नवशी येथे नदीत माशांच्या विविध प्रजाती आहेत. येथील मच्छीमार यावर अवलंबून आहेत. येथे हा प्रकल्प आल्यास त्यांचा उदरनिर्वह नष्ट होईल. हा विषय सध्या न्यायप्रविष्ठ असून सरकार मागच्या दाराने हा प्रकल्प आण्याचा प्रयत्न करीत आहे. डबल इंजिन सरकार आमची फसवणूक करीत असल्याचा आरोप बोरकर यांनी लावला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com