Goa Flood Dainik Gomantak
गोवा

Goa Flood: उदरनिर्वाहाचे साधनच नष्ट झाले, उपासमारीची वेळ; पुरामध्ये वाहून गेल्‍या 11 दुभत्या म्हशी

Goa Monsoon 2024: 11 दुभत्या म्हशी व 01 रेडा पुराच्‍या पाण्‍यात वाहून गेल्‍यामुळे सात ते आठ लाख रुपयांचे नुकसान

गोमन्तक डिजिटल टीम

राज्‍यात ६ व ७ जुलैला कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी मोठी पडझड होऊन कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. अनेकांना आर्थिक फटका बसला.

लाटंबार्से पंचायत क्षेत्रातील नाईकवाडा-वडावल येथील सुधाकर खेमा कळंगुटकर यांच्‍या ११ दुभत्या म्हशी व १ रेडा अशी एकूण बारा जनावरे पुराच्‍या पाण्‍यात वाहून गेल्‍यामुळे त्‍यांचे उदरनिर्वाहाचे साधनच नष्‍ट झाले आहे.

त्‍यामुळे त्‍यांच्‍यावर उपासमारीची वेळ आली आहे. सात ते आठ लाख रुपयांचे त्‍यांना नुकसान झाले आहे.

वडावल येथील सुधाकर कळंगुटकर हे आपल्‍या पाळीव प्राण्‍यांच्‍या जीवावर आपला चरितार्थ चालवतात. पण गेल्‍या रविवारी आणि सोमवारी पडलेल्‍या पावसाने त्‍यांना खूप मोठा आर्थिक फटका बसला आहे.

तीन दिवसांनी आढळल्‍या, पण…!

गेल्‍या रविवारी संध्याकाळी चरायला गेलेल्या म्हशी पुन्‍हा घरी आल्‍या नाहीत. दुसऱ्या दिवशी शोध घेतला, पण जनावरे सापडली नाहीत. तिसऱ्या दिवशी अडचणीच्या भागातून दुर्गंधी येते म्हणून वाट काढून गेले असता म्‍हशी पाण्‍यात मृत आढळून आल्‍या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Liberation Day: नेहरूंनी दिलेला 'तो' एक आदेश अन् गोवा झाला मुक्त; वाचा 36 तासांच्या धडाकेबाज मोहिमेचा थरार

Horoscope: ग्रहांची शुभ स्थिती! 'या' राशींना मिळणार भाग्याची साथ, वाचा तुमचे राशी भविष्य

Syed Mushtaq Ali Trophy 2025: ईशान किशनचं वादळ अन् झारखंडचा ऐतिहासिक विजय; फायनलमध्ये हरियाणाचा धुव्वा उडवत पटकावलं विजेतेपद! VIDEO

Goa Robbery Incident: गेस्ट हाऊसमध्ये घुसून जर्मन पर्यटकाची लूट, 18 वर्षाच्या भामट्याला बेळगावात अटक; कळंगुट पोलिसांची कारवाई

गोव्यात नाताळची जय्यत तयारी! बाजारपेठांमध्ये 'ख्रिसमस'ची धूम; 10 फुटी झाडांनी वेधलं लक्ष

SCROLL FOR NEXT