Suleman Khan Case Dainik Gomantak
गोवा

Suleman Khan: आईच्या धार्मिक विधीसाठी केलेला सुटकेचा अर्ज सुलेमान खानकडून मागे; ठोस कारण देण्यात ठरला असमर्थ

Siddiqui Suleman Khan Bail News: जमीन हडपप्रकरणातील मास्टरमाईंड आणि पोलिस कोठडीतून पलायन केलेल्या संशयित सिद्दिकी ऊर्फ सुलेमान खान याने धार्मिक विधीसाठी सुटका करण्याच्या परवानगीसाठी अर्ज केला होता.

Manish Jadhav

पणजी: जमीन हडपप्रकरणातील मास्टरमाईंड आणि पोलिस कोठडीतून पलायन केलेल्या संशयित सिद्दिकी ऊर्फ सुलेमान खान याने धार्मिक विधीसाठी सुटका करण्याच्या परवानगीसाठी अर्ज केला होता. हा अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठासमोर सुनावणीस आला असता तो मागे घेतला. त्याने अर्जात ज्या कारणासाठी सुटकेची मागणी केली होती ती ग्राह्य नसल्याचे प्रथमदर्शनी खंडपीठाने निदर्शनास आणून दिल्यावर मागे घेण्यात आला.

दरम्यान, न्यायालयीन कोठडीत असलेल्या संशयित सिद्दिकी ऊर्फ सुलेमान खान याने आपल्या आईच्या धार्मिक विधीसाठी उच्च न्यायालयात अर्ज करुन त्याला मूळ गावी जाण्यासाठी परवानगी द्यावी यासाठी अर्ज केला होता. त्याने अर्जात दिलेले कारण त्याला परवानगी देण्याइतपत ठोस नसल्याने अर्जच मागे घेतला. क्राईम ब्रँचच्या पोलिसांनी त्याला गोव्याबाहेरुन अटक केल्यानंतर तो रायबंदर येथील पोलिस कोठडीतून एका कॉन्स्टेबल्सच्या मदतीने फरार झाला होता. अनेक दिवस त्याने पोलिसांना हुलकावणी दिली, मात्र अखेर त्याला गजाआड करण्यात पोलिसांना यश आले. त्याला गोव्यात (Goa) आणल्यावर कडक बंदोबस्तात कोठडीत ठेवण्यात आले.

गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात त्याला अटक झाली होती. त्याच्याविरुद्ध जमीन हडपप्रकरणी तसेच कोठडीतून पलायनप्रकरणी वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले होते.

जमीन हडप प्रकरण

जमीन हडपप्रकरणी त्याच्याविरुद्ध तीन वेगवेगळी आरोपपत्रे न्यायालयात (Court) दाखल झाली आहेत. आरोपपत्रे दाखल होऊनही त्याने जामिनासाठी अर्ज केलेला नाही. काही दिवसांपूर्वी, त्याने पोलिसांकडूनच धोका असल्याचा दावा केला होता. एवढच नाहीतर काही पोलिस अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप देखील केले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT