Lala Ki Basti demolition Dainik Gomantak
गोवा

Lala Ki Basti Demolition: सावंत सरकारचा बुलडोझर; 'लाला की बस्ती'तील 25 अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त

Lala Ki Basti: 'लाला की बस्ती' मधील ४५ घरांच्या बांधकामांना परवानगी कशी काय देण्यात आली, असा प्रश्न येथील 'लाला' म्हणून प्रसिद्ध असलेल्या लाला बेपारी यांनी उपस्थित केला आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

थिवी: राज्यातील अवैध बांधकामे करणाऱ्यांची गय करणार नाही, असा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी इशारा दिला होता. मात्र, अवैध झोपडपट्टी, बस्तीवर कारवाई होणार का?, असा प्रश्न गोमंतकीयांना पडला होता. मंगळवारी (१५ एप्रिल) थिवी येथील कोमुनिदाद जमिनीतील बहुचर्चित लाला की बस्ती या झोपडपट्टीतील २५ अनधिकृत बांधकामे तथा घरे प्रशासनाने जमीनदोस्त केली.

अवचितवाडो-थिवी येथील 'लाला की बस्ती' बहुचर्चित झोपडपट्टीतील घरांवर उत्तर गोवा जिल्हा प्रशासनाने मंगळवारी (१५ एप्रिल) सकाळी ९.३० वाजता बुलडोझर चालवला. सदर बस्तीमध्ये परप्रांतीय मजुरांचे मोठ्या प्रमाणात वास्तव्य होते. मार्चमध्येच या बांधकामांवर कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात होती.

मात्र, काही कारणांनी ती कारवाई रखडली होती. या बस्तीमध्ये बहुसंख्येने अल्पसंख्याक समाजातील लोक वास्तव्य करून आहेत. त्यांचा धार्मिक उत्सव मार्चमध्ये होता. त्यामुळे कारवाई पुढे ढकलण्यात आली होती, असे सूत्रांनी सांगितले

पंचायतीकडून परवानगी कशी?

'लाला की बस्ती' मधील ४५ घरांच्या बांधकामांना परवानगी कशी काय देण्यात आली, असा प्रश्न येथील 'लाला' म्हणून प्रसिद्ध असलेल्या लाला बेपारी यांनी उपस्थित केला आहे. लाला हे माजी सरपंच आहेत. "आपल्या कार्यकाळात या बांधकामांना परवानगी देण्यात आली नव्हती."

"मी सरपंच नसताना या घरांच्या बाधकामांना पंचायतीने परवानगी दिली. या गरिब कुटुंबांना वीज आणि पाण्याच्या कनेक्शनसाठी मात्र मी मदत केली होती, असेही कुळ असलेल्या बेपाारी यांनी सांगितले. ज्यांची घरे पाडण्यात आली आहेत त्यांनी आता स्थानिक आमदारांकडे न्याय मागावा. माझ्याकडे हे लोक आले होते मात्र मी त्यांना कोणतीही मदत करु शकत नाही", असेही त्यांनी स्पष्ट केले.

पोलिस छावणीचे स्वरूप

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जिल्हा प्रशासनाचे अधिकारी मामलेदार तसेच पोलिस कर्मचारी, पंचायतीचे कर्मचारी आज सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास थिवी येथील 'लाला की बस्ती' परिसरात दाखल झाले. कोलवाळ पोलिसांनी परिसरात फौजफाटा तैनात केल्याने परिसराला पोलिस छावणीचे स्वरुप आले होते. पोलिस बंदोबस्तात सकाळी ९.३० वाजता कारवाईला प्रारंभ करण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT