Goa Pune Flight: रात्री आठला सुटणाऱ्या विमानाने रात्री 12.20 वाजता केले उड्डाण; चार तासांच्या विलंबामुळे प्रवाशांचा संताप

Goa Pune Flight Delay: चार तास प्रवाशांना विमानतळावर ताटकळत थांबावे लागले, यावेळेत कोणत्याही प्रकारची रिफ्रेशमेंट, खाद्यपदार्थ देण्यात आले नाहीत, अशी तक्रार आणखी एका प्रवाशाने केली आहे.
Goa Pune flight late night
Goa to Pune flight delayed by four hoursDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोव्यातून विमानाने पुण्याला येणाऱ्या प्रवाशांना चार तास विलंब झाल्यामुळे प्रवशांनी संताप व्यक्त केला. रविवारी (१३ एप्रिल) रात्री आठ वाजता सुटणारी फ्लाईट उशीरा रात्री १२.२० मिनिटांनी सुटल्याने प्रवाशांना पुण्यात पोहोचण्यास उशीर झाला. तसेच, याप्रकरणी विमान कंपनीने कोणतीही पूर्वसूचना न दिल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली.

मिळालेल्या माहितीनुसार, गोवा ते पुणे ही फ्लाईटने रविवारी रात्री ०८.०५ मिनिटांनी उड्डाण घेणे अपेक्षित होते. दरम्यान, फ्लाईटने रात्री उशीरा १२.२० मिनिटांनी उड्डाण घेतले आणि ही फ्लाईट १.१५ मिनिटांनी पुण्यात दाखल झाली. तब्बल चार तास विलंब झाल्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.

Goa Pune flight late night
Goa Biggest Drug Bust: 43 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त; गोवा पोलिसांची आजवरची सर्वात मोठी कारवाई

याप्रकरणी फ्लाईटमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून घडलेल्या प्रकाराबाबत माहिती दिली आहे. "गोवा ते पुणे फ्लाईटने चार तास विलंबाने उड्डाण केले. याबाबत कोणतीही आगाऊ सूचना देण्यात आली नाही. कोणत्याही प्रकारची दिलगिरी व्यक्त केली नाही. रिफ्रेशमेंट दिली नाही तसेच, गोवा विमानतळावर बससेवा देण्यात आली नाही. प्रवाशांना पायी चालत बाहेर पडावे लागले. मॅनेजर आणि ग्राऊंड स्टाफ भांडत होते. खराब अनुभव!", अशी प्रतिक्रिया एका प्रवाशाने दिली आहे.

या प्रवाशाने एक्सवर Fly91 कंपनीला टॅग करून ट्विट करत प्रवासाच्या अनुभवाबाबात मत व्यक्त केले आहे. तसेच, पुणे विमानतळावर प्रवासी उतरल्यानंतर चालत जात असतानाचा व्हिडिओ देखील त्याने शेअर केला आहे. कंपनीने देखील प्रवाशाला उत्तर देत कंपनीला मेल करण्याचे आवाहन केले.

Goa Pune flight late night
Sattari Crime: हनुमान मंदिराजवळ आढळला 24 वर्षीय तरुणाचा मृतदेह; खुनाचा संशय, नगरगावात खळबळ

फ्लाईटला विलंब होणार असल्याची माहिती अनेक प्रवासी गोवा विमानतळावर दाखल झाल्यानंतर देण्यात आली. चार तास प्रवाशांना विमानतळावर ताटकळत थांबावे लागले, यावेळेत कोणत्याही प्रकारची रिफ्रेशमेंट, खाद्यपदार्थ देण्यात आले नाहीत, अशी तक्रार आणखी एका प्रवाशाने केली आहे. प्रवाशांनी विमान कंपनीच्या ढीसाळ कारभरावर टीका केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com