Goa News 2025 Flash Back Dainik Gomantak
गोवा

देशाला हादरवून सोडणाऱ्या 2025 मध्ये गोव्यात घडलेल्या तीन घटना

Goa 2025 Flashback: गोवा गुन्हेगारी कृत्य आणि गुन्हेगारांसाठी सेफ हेवन ठरतोय का? कॅन्सरच्या पेशीसारख्या पसरणाऱ्या अवैध व्यवसायांवर कधी चाप बसणारच नाही का? अशी चिंता आता गोमंतकीयांना सतावत आहे.

Pramod Yadav

पणजी: देशाची पर्यटन राजधानी मानल्या जाणाऱ्या गोव्यासाठी २०२५ साल हादरवून सोडणाऱ्या धक्कादायक घटनांमुळे गाजले. या घटनांमुळे सरकार आणि प्रशासनावर गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले मात्र, नेहमीप्रमाणे सरकारने कातडी बचाव भूमिका घेतल्याचे दिसून आले.

इवल्याशा राज्यात वाढणाऱ्या गुन्हेगारी घटना डोकेदुखी ठरत असताना नाईट क्लबला लागलेल्या आगीमुळे राज्यात अवैध व्यवसाय बोकाळले असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले. सामाजिक कार्यकर्त्यावर दिवसाढवळ्या झालेल्या जीवघेण्या हल्ल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर आणि सरकारच्या नैतिकतेवरही सवाल उपस्थित करण्यात आला.

लईराईदेवीच्या यात्रेतील चेंगराचेंगरी

शिरगाव येथील लईराई देवी गोव्यासह शेजारील महाराष्ट्र आणि कर्नाटकातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. लईराईची यात्रा दरवर्षी मोठ्या दिमाखात साजरा होते, यावर्षी मात्र या उत्सवाला गालबोट लागले.

०३ मे २०२५ (शनिवारी) यात्रेत चेंगराचेंगरीची घटना घडली आणि यात सहा भाविकांचा मृत्यू झाला तर, ६० हून अधिक भाविक जखमी झाले. कारवाई म्हणून सरकारने तात्काळ विविध प्रशासकीय अधिकाऱ्यांचे निलंबन करुन चौकशी समिती स्थापन केली. नियोजनाच्या अभावामुळे ही दुर्घटना घडल्याचे दिसून आला.

सामाजिक कार्यकर्ते रामा काणकोणकर यांच्यावरील हल्ला

सामाजिक कार्यकर्ते रामा काणकोणकर यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यामुळे राज्यातील सामाजिक आणि राजकीय वातावरण ढवळून निघाले. आमदारावर केलेल्या टीकेमुळे सहा - सात जणांच्या टोळ्याने दिवसाढवळ्या काणकोणकरांना टार्गेट केले.

१८ सप्टेंबर २०२५ रोजी करंझाळे येथे टोळक्याने काणकोणकरांना गाठून त्यांच्या तोंडावर शेण फेकले. शर्ट फाडून त्यांना चेनने अमानुष मारहाण केली. दुचाकीवरुन आलेले गुंड घटनास्थळावरुन फरार झाले.

रामा यांच्यावरील हल्ल्यामुळे राज्यातील सामाजिक आणि राजकीय नेते एकवटून रस्त्यावर उतरले. पणजीत मोठा मोर्चा निघाला विरोधी पक्षातील नेत्यांनी सरकार जाब विचारण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी धडक दिली.

सरकारने सखोल तपास करुन दोषींना कडक शासन करण्याचे आश्वासन दिले. याप्रकरणी पोलिसांनी गुंड जेनिटो कार्देझसह अन्य सहा ते सात जणांना अटक केली. रामाने दिलेल्या माहितीत त्याने मुख्यमंत्र्यांसह भाजप आमदारावर विविध आरोप केले होते.

बर्च बाय रोमिओ लेन नाईटक्लब आग दुर्घटना

डिसेंबरच्या सुरुवातीलाच उत्तर गोव्यात बर्च बाय रोमिओ लेन या हडफडे येथील नाईटक्लबला भीषण आग लागली. यात २५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. याप्रकरणी गोवा पोलिसांनी नाईटक्लबचे मालक सौरभ आणि गौरव लुथरा यांना अटक केली असून, सध्या ते पोलिस कोठडीत आहेत.

या घटनेची हायकोर्टाने स्वेच्छा दखल घेतली. राज्यात बेकायदेशीर व्यवसाय बोकाळले असल्याचे यामुळे पुन्हा एकदा समोर आले. ऐन पर्यटन हंगामाच्या सुरुवातीला घडलेल्या या घटनेमुळे पर्यटनाला देखील फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या घटनेनंतर जाग आलेल्या सरकारने राज्यातील अवैध नाईटक्लबवर कारवाई करण्यास सुरुवात केली. अनेक नाईटक्लब या ड्राईव्हमध्ये सील करण्यात आले. राज्यात यावर्षी (२०२५) घडलेल्या तिन्ही घटना सरकार आणि प्रशासनावर गंभीर प्रश्न उपस्थित करणाऱ्या आहेत.

वैविध्यपूर्ण संस्कृती, शांतता, आधारतिथ्य यासाठी प्रसिद्ध असणारा गोवा गुन्हेगारी कृत्य आणि गुन्हेगारांसाठी सेफ हेवन ठरतोय का? कॅन्सरच्या पेशीसारख्या पसरणाऱ्या अवैध व्यवसायांवर कधी चाप बसणारच नाही का? अशी चिंता आता गोमंतकीयांना सतावत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"माणसं पिंजऱ्यात आणि प्राणी मोकळे"! गोवा अ‍ॅनिमल लिबरेशन मूव्हमेंटचा ‘रिव्हर्स रोल-प्ले’; मांसाहाराविरुद्ध प्राणी मुक्ती मोर्चा

Dhalanche Mand: डिचोलीत फुलू लागलेत धालांचे मांड! लोकसंस्कृतीचे दर्शन; 'रंभा अवसर' प्रथेचे आकर्षण

पोर्तुगीजांनी गोव्‍यात व्‍यसनं आणली, गोवेकरांनी आध्‍यात्‍मिक वारसा जपला; आता देवपूजेबरोबर जास्‍त मानवसेवा करण्‍याची गरज..

Goa Live News: उत्तर गोवा जिल्हा पंचायत: भाजपची नामांकने जाहीर

एकाच महिन्यात 200 अपघात आणि 18 बळी, नितीन गडकरींचे CM सावंतांना पत्र; वैयक्तिक लक्ष देण्याची मागणी!

SCROLL FOR NEXT