माणुसकीची ‘जीत’! मदुराईहून चेन्नईला हेलिकॉप्टरने नेले हृदय, गोव्यातील व्यक्तीला दिला पुनर्जन्म; आमदार आरोलकरांची कार्यतत्परता

Umesh Warak heart transplant: सविस्तर माहिती अशी, की कासारवर्णे येथील मोपा पठारावरील रहिवासी उमेश वरक (वय ३४ वर्षेे) हे अग्निशमन दलात वाहनचालक म्हणून दोन वर्षांपूर्वी रुजू झाले होते.
 Umesh Warak heart transplant
Umesh Warak heart transplantDainik Gomantak
Published on
Updated on

मोरजी: मांद्रे मतदारसंघाचे आमदार जीत आरोलकर यांनी योग्य वेळी दाखविलेली कार्यतत्परता आणि सढळ हस्ते केलेली आर्थिक मदत कासारवर्णे येथील उमेश वरक यांचे प्राण वाचविण्यासाठी उपकारक ठरली. वरक यांच्यावर चेन्नई येथे हृदयरोपणाची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली.

सविस्तर माहिती अशी, की कासारवर्णे येथील मोपा पठारावरील रहिवासी उमेश वरक (वय ३४ वर्षेे) हे अग्निशमन दलात वाहनचालक म्हणून दोन वर्षांपूर्वी रुजू झाले होते. मात्र, ते गंभीर आजाराने त्रस्त होते. त्यांच्यावर सुरुवातीला मुंबई येथे फोर्टीस इस्पितळामध्ये उपचार सुरू होते. त्यांच्यावर हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया आवश्‍यक होती.

त्यासाठी सुमारे ४० लाख रुपये खर्च येणार होता. हा खर्च कसा उभा करायचा, हा वरक कुटुंबासमोर यक्षप्रश्‍न होता. त्यांनी वेळोवेळी लोकांकडे आर्थिक मदत मागितली होती. अशा वेळी वरक कुटुंबीयांसाठी मांद्रे मतदारसंघाचे आमदार जीत आरोलकर हे देवदूताप्रमाणे मदतीसाठी धावून आले.

त्यांनी थेट मुंबईत जाऊन उमेश वरक आणि कुटुंबीयांची भेट घेतली आणि त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. उमेश यांच्या उपचाराचा सर्व खर्च स्वतः उचलणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

त्यानंतर आरोलकर यांनी उमेश यांना विमानाने चेन्नई येथील इस्पितळात नेले. तेथील तज्ज्ञ डॉक्टरांनी उमेश यांच्यावर हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया केली आणि ती यशस्वीही झाली.

दुर्धर आजाराने त्रस्त असलेला उमेश् हृदय रुग्ण असून त्यांचे हृदय बदलून मुंबई येथे फोर्टीक या खाजगी हॉस्पिटलमध्ये सुरुवातीला उपचार सुरू करण्यात आले. त्यांचे हृदय प्रत्यारोपण करण्यासाठी 40 लाखाचा खर्च येईल. अशी अपेक्षा डॉक्टरांनी ठेवली होती. उमेश वरक यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची होती. त्यांच्या कुटुंबाला एवढा खर्च करणे शक्य होणार नाही. आणि देवाच्या रूपात उमेशला पुनर्जन्म देण्याचं काम आमदार जीत आरोलकर यांनी दिला.

 Umesh Warak heart transplant
Silent Heart Attack: सायलेंट हार्ट अटॅक म्हणजे काय? दुर्लक्ष करणं पडू शकत महागात; जाणून घ्या कारणे, लक्षणे आणि धोकादायक परिणाम

देवरूपाने आरोलकर मदतीला आले

देवाच्या रूपानेच आमदार जीत आरोलकर आमच्या मदतीसाठी धावून आले, अशा शब्दांत वरक कुटुंबीयांनी त्यांचे आभार मानले. विशेष म्हणजे, उमेश वरक हे जीत आरोलकर यांच्या मतदारसंघातील मतदार नाहीत. तरीही माणुसकीच्या हेतूने त्यांनी वरक कुटुंबीयांना जी मदत केली त्याबद्दल त्यांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

 Umesh Warak heart transplant
Jeet Adani Marriage: शाही विवाहसोहळ्याचा खर्च टाळला, समाजसेवेसाठी देणार 10 हजार कोटी; अदानींची घोषणा

मदुराईहून चेन्नईला हेलिकॉप्टरने नेले हृदय

एका अपघातग्रस्त युवकाचे हृदय मदुराई येथून हेलिकॉप्टरने चेन्नईला आणले. वेळेत शस्त्रक्रिया पूर्ण झाल्यामुळे उमेश वरक यांना जीवनदान लाभले. यासाठीचे सर्व नियोजन आणि खर्चाचा भार आमदार जीत आरोलकर यांनी पेलल्याने त्यांच्या या स्पृहणीय कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com