Lairai Devi Jatra 2024  Dainik Gomantak
गोवा

Lairai Devi Jatra 2024 : शिरगावात ‘गोबी’ला बंदी; मात्र अस्नोड्यात थाटले स्टॉल्‍स

Lairai Devi Jatra 2024 : उमटल्‍या संमिश्र प्रतिक्रिया : लईराई देवीच्‍या जत्रोत्‍सवात बंदीची काटेकोरपणे अंमलबजावणी

गोमन्तक डिजिटल टीम

Lairai Devi Jatra 2024 :

डिचोली, श्री लईराई देवीच्या जत्रेत यंदाही गोबी मंच्युरियनचे स्टॉल्‍स दिसून आले नाहीत. तर, दुसऱ्या बाजूने अस्नोडा पंचायत क्षेत्रात मात्र शिरगावच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर ‘गोबी’चे स्टॉल्‍स दिसून येत होते.

ते अस्नोडा पंचायत क्षेत्रात येत असल्याने कोणी कारवाई करण्यासही पुढे आले नाही.

शिरगावात जत्रेच्या फेरीत ‘गोबी’चे स्टॉल्‍स नसले तरी ‘गोबी’खवय्यांच्या जिभेचे चोचले पूर्ण झाले. शिरगावात जत्रेसाठी आलेल्या अनेकांनी शिरगावच्या हद्दीबाहेर अस्नोड्यात ‘गोबी’चा मनसोक्त आस्वाद घेतला. रात्री उशिरापर्यंत हे स्टॉल्‍स सुरू होते.

गेल्या वर्षी जत्रोत्सवाच्या काळात तर ‘गोबी मंच्युरियन’वाले शिरगावात फिरकले नाहीत. यंदाही जत्रेत ‘गोबी’चे स्टॉल्‍स थाटण्यास बंदी घालण्याच्या निर्णयाची कडकपणे अंमलबजावणी करण्याचे देवस्थान समितीने ठरविले होते. त्यामुळे यंदाही श्री लईराई देवीच्या जत्रेत शिरगावात असे स्टॉल्‍स थाटण्याचे धाडस ‘गोबी’वाल्यांनी केले नाही. त्यामुळे सलग तिसऱ्या वर्षी शिरगावात ‘गोबी’चे स्‍टॉल्‍स दिसून आले नाहीत.

शिरगाव झाले ‘गोबीमुक्त’

गेल्या काही वर्षांपासून ‘गोबी मंच्युरियन’चे प्रस्थ वाढले आहे. गावोगावी साजऱ्या होणाऱ्या जत्रा आणि अन्य उत्सवावेळी ‘गोबी’चे स्टॉल्‍स दिसून येत आहेत. तीन वर्षांपूर्वी शिरगाव जत्रोत्सवात हेच चित्र दिसून येत होते. ‘गोबी’वाल्यांचा उद्रेक वाढला होता.

मात्र २०२२ साली शिरगाव जत्रेत ‘गोबी’च्या स्टॉल्‍सवर बंदी घालण्याचा निर्णय देवस्थान समितीने घेऊन त्याची कडकपणे अंमलबजावणी केली. तेव्‍हापासून या जत्रोत्‍सवात ‘गोबी’चे स्‍टॉल्‍स लावण्‍याचा केलेला प्रयत्न यशस्वी झाला नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

Crime News: आधी प्रेमसंबंध, नंतर हत्येचा कट! पत्नीने पतीच्या मदतीने प्रियकराचा गळा आवळला; मृतदेह गोणीत भरून कालव्यात फेकला

Triple Talaq Case: लग्नानंतर 21 वर्षे संसार, 3 मुलं आणि आता...! बायकोला ट्रिपल तलाक देणाऱ्या नवऱ्याला कोर्टाचा दणका; सुनावली 'इतक्या' वर्षांची शिक्षा अन् दंड

VIDEO: 'सर्वात मोठे ओठ' बनवण्याचा अट्टहास! डॉक्टरांनी नकार दिल्यावर महिलेने घरीच घेतलं इंजेक्शन; पुढे नको तेच झालं, पाहा व्हिडिओ

Bulbul Film Festival: बुलबुल बालचित्रपट महोत्सवाची सांगता; 'द ग्रेट ग्रॅंड सुपर हिरो'चे प्रदर्शन, सर्वोत्तम चित्रपटाची घोषणा

SCROLL FOR NEXT