New Aerocity In Goa: दरवर्षी देश-विदेशातील लाखो पर्यटक गोव्याला भेट देतात. गोवा हे पर्यटकांसाठी सुट्ट्या एन्जॉय करण्याचं आवडतं ठिकाण आहे. पर्यटनासोबतच गोवा आता एक वेडिंग डेस्टिनेशन म्हणूनही उदयास येत आहे.
दरम्यान, गोवा सरकारची एक पॉलिसी चांगलीच चर्चेत आहे. अनेकदा गोव्यात लोकांना लग्नासाठी अडथळ्यांचा सामना करावा लगतो. मात्र आता लग्नगाठ बांधणाऱ्या जोडप्यांना कोणत्याही अडथळ्यांचा सामना करावा लागणार नाही.
होय, तुम्ही ऐकलं ते खरं आहे. सरकारने (Government) हे सर्व अडथळे दूर करण्यासाठी सिंगल-विंडो सिस्टमसह बीच वेडिंग पॉलिसी सुरु केली आहे. येथे येणारी ‘नवीन एरोसिटी’ गोव्याच्या पर्यटन क्षेत्रात नवा बदल घेऊन येईल, असे गोवा राज्याचे पर्यटन सचिव संजीव आहुजा म्हणाले. IANS शी बोलताना आहुजा म्हणाले की, नवीन एरोसिटीमुळे गोव्यातील पर्यटनाच्या संधींना आणखी चालना मिळेल.
अहुजा पुढे म्हणाले की, ‘’मोपा विमानतळावरील नवीन एरोसिटी येत्या काही वर्षांत पर्यटन-अनुकूल राज्यात पर्यटन संभावनांना चालना देण्यासाठी सज्ज आहे. पर्यटकांसाठी एक गोल्फ कोर्स असेल जो गोव्याला भेट देणाऱ्या MICE पर्यटकांना गुंतवून ठेवेल. ही एरोसिटी दिल्ली एरोसिटीच्या धर्तीवर विकसित केली जाईल.’’
दरम्यान, वेडिंग डेस्टिनेशन म्हणून देशभरात राज्याची ख्याती व्हावी यासाठी राज्य सरकार प्रयत्नरत असल्याचेही ते म्हणाले. ते पुढे असेही म्हणाले की, गोव्यात समुद्रकिनारी वेडिंग प्रचलित आहे. गोवा सरकार यास अजून प्रमोट करण्यासाठी काम करत आहे.
“आम्हाला समुद्रकिनारी असेलेली ठिकाणे लोकप्रिय होत असल्याचे पाहून आनंद होत आहे. राज्य सरकारने गोव्यात बीच वेडिंग पॉलिसी आणली आहे, ज्यामुळे बीच वेडिंगसाठी परवानगी घेणे सोपे होईल. आम्ही यासाठी सिंगल विंडो सिस्टीमही सुरु करत आहोत, जिथे लोक अर्ज करु शकतात आणि बीच वेडिंगसाठी परवानगी मिळवू शकतात. गोव्याला वेडिंग डेस्टिनेशन म्हणून आम्ही प्रमोट करत आहोत.” असेही अहुजा यांनी नमूद केले.
आहुजा म्हणाले की, ‘मला याबाबतीत राजस्थानचे (Rajasthan) कौतुक वाटते. राजस्थान सरकारने वेडिंग डेस्टिनेशन तयार केली.’ उदयपूर येथून वेडिंग डेस्टिनेशन ट्रेंड सुरु करण्याचे श्रेय त्यांनी राज्याला दिले.
गोवा राजस्थानच्या धर्तीवर असे वेडिंग डेस्टिनेशन तयार करत आहे का असे विचारले असता अहुजा म्हणाले की, “आम्ही राजस्थान सरकारशी याबाबतीत चर्चा केली. राजस्थान हे पहिले राज्य आहे जिथे डेस्टिनेशन वेडिंगला प्रमोट केले गेले. आम्ही देशभरातील सर्व राज्यांच्या पर्यटन विभागांशी संपर्क करत असून नियमित संवाद साधतो. जेणेकरुन सर्व राज्ये एकमेकांकडून शिकतील.”
आहुजा पुढे म्हणाले की, ‘’आम्ही गोव्याला पर्यटनासाठी जगभरात प्रमोट करत आहोत. विविध देशांमध्ये रोड शोही आयोजित करत आहेत. त्याचबरोबर जगभरातील पर्यटन फेस्टिव्हलमध्येही सहभागी होत आहेत.’’
गोव्याने आठ G20 बैठकांचे आयोजन केले आहे, जे भारतातील कोणत्याही राज्यांपेक्षा अधिक आहे.” असेही ते पुढे म्हणाले.
ते शेवटी म्हणाले की, ‘’पीक सीझनमध्ये हाय-एंड रुम इन्व्हेंटरीज उपलब्ध नसतात आणि नवीन एरोसिटी ही या समसयेवर तोगडा असेल. आमच्याकडे एरोसिटीमध्ये अनेक नवीन हॉटेल्स येत आहेत, जेणेकरुन येथे येणाऱ्या पर्यटकांसाठी हाय-एंड रुम इन्व्हेंटरीज उपलब्ध करुन देता येतील.”
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.