Mapusa Cylinder Blast  Dainik Gomantak
गोवा

Mapusa Cylinder Blast: घातपात नव्हे 'यामुळे' झाला बारमध्ये स्फोट, काय म्हणाले गोव्याचे DGP?

त्याच दिवशी सायंकाळी बॉम्बशोधक पथक व फॉरेन्सिक टीमने घटनास्थळाची पाहणी केली.

Pramod Yadav

म्हापसा येथील डांगी-कॉलनीमध्ये रविवारी पहाटे बार-रेस्टॉरंटमध्ये जबरदस्त स्फोट झाला. या स्फोटाची तीव्रता इतकी होती की, बारशेजारील काही घरांच्या भिंतींना तडे गेले, तर काहींची काचेची तावदाने फुटली. सुदैवाने जीवितहानी टळली. 

मात्र, हा स्फोट नेमका कशामुळे झाला, याचे गूढ अद्याप उलगडलेले नाही. कारण येथील सिलिंडरचा स्फोट झालेला नाही. त्यामुळे बारमधील एसी, फ्रिजमधील गॅस किंवा सिलिंडरमधील नेमका कोणत्या गॅसचा स्फोट झाला. यासाठी त्याच दिवशी सायंकाळी बॉम्बशोधक पथक व फॉरेन्सिक टीमने घटनास्थळाची पाहणी केली. दरम्यान, बारमालकाने या प्रकरणात घातपाताचा संशय व्यक्त केला होता.

कशामुळे झाला स्फोट काय म्हणाले पोलिस महासंचालक जसपाल सिंग?

गोव्याचे पोलिस महासंचालक जसपाल सिंग यांनी स्वत: म्हापसा येथीस स्फोट बाबत माहिती दिली आहे.

"बॉम्बशोधक पथक व फॉरेन्सिक टीमने घटनास्थळाची पाहणी केली, पोलिसांना यात काही संशयास्पद सापडले नाही. सुरक्षात्मक उपायांची पुरेशी काळजी न घेतल्यामुळे हा स्फोट झाला आहे." असे जसपाल सिंग म्हणाले. तसेच, नागरिकांना अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन देखील DGP सिंग यांनी केले आहे.

पोलिसांनी आणि अग्निशमन दलाने केलेल्या तपासानंतर हा स्फोट गॅस गळतीमुळेच झाला असल्याची माहिती जिवबा दळवी यांनी दिली आहे. गॅसला जोडण्यात आलेल्या पाईप आयएसआय मानाकिंत देखील नव्हत्या. पाईप जवळ आग असण्याची शक्यता असून, त्यामुळेच हा स्फोट झाला असे दळवी म्हणाले.

दरम्यान, रविवारी पहाटे 5.53 च्या सुमारास ‘हिल-टॉप’ बार-रेस्टॉरंटमध्ये स्फोट झाला. घटनेची माहिती म्हापसा अग्निशमन दलास मिळताच दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले. स्थानिक व जवानांनी आग शमवली. त्यानंतर बारमध्ये प्रवेश करून जवानांनी तेथील आग विझवली. 

या दुर्घटनेत अडीच लाखांचे नुकसान झाले असून पाच लाखांची मालमत्ता वाचविली, असे अग्निशमन दलाने सांगितले. या स्फोटात चार चारचाकी तर तीन दुचाकींचे नुकसान झाले. शिवाय सात घरांनाही फटका बसला. काही फ्लॅटच्या भिंतीला मोठे तडे गेले आहेत. तसेच घरातील साहित्य व स्वयंपाक खोलीतील भांडी अस्ताव्यस्त पडली आहेत.

बार-रेस्टॉरंटच्या मालक प्रमिला मयेकर यांनी याबाबत घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. पोलिसांकडून बारमधील दोन सिलिंडर तपासणीसाठी पाठविले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Glenn Maxwell Stunning Catch: अविश्वसनीय! ग्लेन मॅक्सवेलने सीमारेषेवर घेतला आतापर्यंतचा जबरदस्त कॅच, VIDEO बघाच

Ganesh Festival 2025: गणपतीत गावाक कसा जावचा? तिकीट महागलं, कोकणात जाण्याचा खर्च आता परदेशी सहलीसारखा! जाणून घ्या दर

Dharali Cloudburst: मिलिटरीला सलाम! उत्तरकाशी धरालीमध्ये बेले ब्रिज तयार; वाहतूक पूर्वपदावर

INDIA Alliance Protest: संसद परिसरात हायव्होल्टेज ड्रामा! राहुल गांधी, संजय राऊतांना पोलिसांनी घेतलं ताब्यात; इंडिया आघाडीचा मोर्चा अडवला

Margao: मडगावात 85 सीसीटीव्ही कॅमेरे लवकरच बसवणार, आमदार कामत यांनी दिली माहिती

SCROLL FOR NEXT