Kulem Shigao Crime Dainik Gomantak
गोवा

Kulem Shigao: कुळे-शिगावात 3 युवकांना भर बाजारात मारहाण! चारजण पोलिसांच्या ताब्यात

Kulem Shigao Assault: भारतीय न्याय सहिता ३५ (५) या कलमाखाली त्यांना नोटीस देऊन कुळे पोलिसांनीसर्वांना हजर राहण्याचा आदेश दिला आहे.

Sameer Panditrao

फोंडा: कुळे-शिगाव पंचायत क्षेत्रातील गावातील तीन युवकांना मारहाण करून पळून गेलेल्या विनय गावकर (२१, पाणीवाडा-बोरी), देवेंद्र शेलापकर (३१, माशेल-बेतकी), प्रीतेश कामत (२९, दाभोली-शिरोडा) व यशवंत ऊर्फ बाबू नाईक (४०, गावणे-बांदोडा) या चौघांना कुळे पोलिसांनी ताब्यात घेऊन तपास केला.

भारतीय न्याय सहिता ३५ (५) या कलमाखाली त्यांना नोटीस देऊन कुळे पोलिसांनी उद्या सकाळी १० रोजी सर्वांना हजर राहण्याचा आदेश दिला आहे. यापूर्वी मोले येथील बुधो गावकर यांना १५१ कलमाखाली अटक करून जामिनावर मुक्त केले होते.

गेल्या पाच दिवसांपूर्वी या पाचजणांनी मिळून मोले येथे कुळे-शिगाव येथील तीन युवकांना भर बाजारात मारहाण केली होती. जेव्हा येथील ग्रामस्थांना समजले तेव्हापासून ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सर्वांना अटक करा, अशी मागणी केली होती.

त्याच दिवशी मोले येथील बुधो गावकर यानाला अटक केली होती. नंतर बुधोने सर्वांची नावे सांगितली तेव्हा इतरांनाही आज रितसर ताब्यात घेतले.

ग्रामस्थ आक्रमक झाल्यानंतर या सर्वांनी ग्रामस्थांची माफी मागितली. कुळे पोलिस निरीक्षक राघोबा कामत यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक वैभव जल्मी तपास करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT